गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. हाती येत असलेले कल पाहता भाजप पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यशस्वी होणार असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. आणखी तासाभरात आकडेवारी संदर्भातील चित्रही स्पष्ट होणार आहे. सकाळी सुरुवातीचे कल पाहता काँग्रेसने काही काळ आघाडी घेतली. भाजपची पिछेहाट होत असल्याचे पाहून शेअर मार्केट कोसळल्याचे पाहायला मिळाले.
आघाडी आणि कल
2017 लाइव्ह निकाल | गुजरात विधानसभा 2017 | हिमाचल प्रदेश विधानसभा 2017 |
एकूण जागा | 182 | 68 |
भाजप | 95 जागांवर पुढे | 38 जागांवर पुढे |
काँग्रेस | 85 जागांवर पुढे | 26 जागांवर पुढे |
इतर/अपक्ष | 2 | 2 |
सर्व एक्झिट पोलनी दोन्ही राज्यांत भाजपच्या सत्तेचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र निकालाआधीच पाटीदार नेता हार्दिक पटेलने ईव्हीएम हॅकिंगचे दावे केले आहेत. तो म्हणाला, अहमदाबादच्या कंपनीचे १४० इंजिनिअर ५ हजार ईव्हीएमचे सोर्स कोड हॅक करण्याच्या तयारीत आहेत. देवनिर्मित शरीराशी छेडछाड होऊ शकते, तर मानवनिर्मित ईव्हीएमशी का नाही? एटीएम हॅक होऊ शकते तर ईव्हीएम का नाही? गुजरातचे मुख्य निवडणूक आयुक्त बी.बी. स्वेन यांनी आरोप फेटाळले. दरम्यान, टीव्ही मुलाखतीवरून राहुल गांधी यांना बजावलेली नाेटीस निवडणूक आयोगाने मागे घेतली आहे.
गुजरात...
>एकूण जागा १८२,
>बहुमत : ९२
>मतदान : ६८.४१%
>बहुमत : ९२
>मतदान : ६८.४१%
मावळत्या विधानसभेत भाजप ११५, काँग्रेसला ६१ जागा आहेत. भाजप गेल्या २२ वर्षांपासून सत्तेत आहे.
हिमाचल प्रदेश...
>एकूण जागा ६८,
>बहुमत : ३५
>मतदान : ७५.२८%
काँग्रेसला ३६ व भाजपला २६ जागा आहेत. १९९० पासून काँग्रेस-भाजप आलटून-पालटून सत्तेत.
>एकूण जागा ६८,
>बहुमत : ३५
>मतदान : ७५.२८%
काँग्रेसला ३६ व भाजपला २६ जागा आहेत. १९९० पासून काँग्रेस-भाजप आलटून-पालटून सत्तेत.
निवडणुकीला मोदी विरुद्ध राहुल असा रंग आहे. गुजरातेत भाजप सलग सहाव्यांदा सरकार स्थापण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या नव्या इनिंगची सुरुवात २२ वर्षांनंतर गुजरात जिंकून करू इच्छितात. या निवडणुकीचा थेट परिणाम २०१९ च्या लोकसभा निकालांवरही होईल.
महिलांचे कमी मतदान, भीतीचे वातावरण आदी घटक ठरू शकतात प्रभावी
- यंदा महिलांचे मतदान ८% कमी झाल्याने याचा परिणाम निकालावर, एक्झिट पोलच्या अंदाजांवर दिसू शकतो. शिवाय, नोटबंदी-जीएसटीसारखे निर्णय पाहता केंद्रातील भाजप सरकारवर पुरुषांचा राग अधिक होता. तो मतदानादरम्यान कोणत्या रूपात उतरला आहे, हे पण महत्त्वाचे ठरेल.
- दहशत व भीतीचे वातावरण हाही घटक महत्त्वाचा ठरतो. कदाचित यामुळेच एक्झिट पोलमध्ये किती लोक खरे बोलले असतील, हे सांगणे कठीण आहे.
- एक्झिट पोलचा आधार घेतला तर बहुतांश म्हणजेच ९०% संस्थांचा कल भाजपकडे, तर १० % कल काँग्रेसकडे झुकणारा आहे. मात्र, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी एक्झिट पोलचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरवला होता. तेथ एक्झिट पोलमध्ये हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने ९०% आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने केवळ १० टक्के कल होता. मात्र झाले उलटे. ट्रम्प निवडून आले आणि हिलरी पडल्या.
- सट्टाबाजाराने भाजपला या निवडणुकीत ९५ ते १०५ पेक्षा अधिक जागा दिलेल्या नाहीत.
Post a Comment