0
कॉलेज तरुणी हात जोडत होती, गुंडांचे टोळके काढत होते छेड; व्हिडिओही केला व्हायरल


नवी दिल्ली -ओडिशाच्या बारागड जिल्ह्यात कॉलेज तरुणीच्या छेडछाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कॉलेजमधून आपल्या मित्रांसह परतत असलेल्या मुलीची तरुणांचे टोळके छेडछाड काढताना दिसत आहे. सोबतच मुलीसह जात असलेल्या मुलालाही बेदम मारहाण झाली. हा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे.
तरुणी होत जोडत होती, पण ते छेड काढत होते...
- व्हिडिओत स्पष्ट दिसतेय की, तरुणी या मुलांना अनेक वेळा जाऊ द्या म्हणून विनवणी करत आहे, हात जोडून विनंती करतेय, परंतु तिचा मुले तिचा पाठलाग करत आहेत आणि तिची छेड काढत आहेत.
- पोलिसांच्या मते, हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचाच आहे. मेलचामुंडा-पद्मापूर रस्त्यावरून कॉलेजची विद्यार्थिनी घरी परतत असताना काही मुलांच्या टोळक्याने हे कृत्य केले. बारगडचे एसपी म्हणाले, शनिवारी इंटरनेटवर हा व्हिडिओ आल्यावर आम्ही तपासाचे आदेश दिले आहेत.
- व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली असून आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी रविवारी मीडियाला ही माहिती दिली.

Post a Comment

 
Top