![]() |
मुंबई-बारा कामगारांचा बळी घेणाऱ्या साकीनाका येथील फरसाण दुकानाला लागलेल्या आगीसाठी बेकायदेशीर व्यवसाय कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भानू फरसाण दुकानाचे मालक रमेश भानुशाली याला अटक केली असून अंधेरी न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. साकीनाक्यातील खैरानी रोडवरील गरीबनगरमधील हा गाळा मखरिया या व्यक्तीच्या नावावर आहे. या ठिकाणी आधी बूट व्यवसाय व नंतर रेडिमेड गारमेंट व्यवसाय आणि आता फरसाण उत्पादनाचा व्यवसाय केला जात होता. या उत्पादनासाठी संबंधित मालक किंवा व्यावसायिकाने पालिकेकडून परवानगी घेतली नसल्याचे या वॉर्डचे सहायक आयुक्त अजितकुमार अंबी यांनी सांगितले. व्यावसायिक भानुशाली याने कामगारांची नोंदणी करताना फक्त ५ कामगार असल्याची नोंद पालिकेकडे केली. प्रत्यक्षात जास्त कामगारांना या ठिकाणी ठेवले जात होते. या कामगारांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठीही कोणतीही व्यवस्था किंवा सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती.
भाडेकरूला जागा देताना पोलिसांकडून पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. पण, मालकाने तेदेखील केले नव्हते. भानू फरसाणच्या गाळ्यामध्ये डिझेल भट्ट्या, डिझेल वॉइल, एलपीजी गॅस सिलिंडर, पॅकिंग मटेरियलमुळे आग भडकली हाेती.
|
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment