0
संसदेतल बोलू दिले नाही तर, सचिनने जारी केला व्हिडिओ, म्हणाला, 'अनफिट इंडिया हा मोठा धोका'
नवी दिल्‍ली -सचिन तेंडुलकर राज्यसभेत जे भाषण करणार होता, ते तो विरोधकांच्या गोंधळामुळे देऊ शकला नव्हता. पण सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांपर्यंत आणि भारतीय नागरिकांपर्यंत ते पोहोचवले आहे. व्हिडिओद्वारे केलेल्या या भाषणात सचिनने खेळ आणि खेळाच्या दृष्टीने देशाचे भवितव्य याबाबत विचार व्यक्त केले आहेत. सचिनने तरुणांना खेळात करिअर घडवण्याचा सल्ला देताना म्हटले की, सध्या आपण फिटनेसचे सेशन कमी आणि खाण्या पिण्याचे सेशन वाढवत आहोत. पण हे आपण बदलायला हवे. सचिन म्हणाला, आपण भारताला खेळ आवडणाऱ्या देशाऐवजी खेळणारा किंवा खेळाडुंचा देश अशी ओळख निर्माण करायला हवी. त्यासाठी तरुणाईने मोठ्या प्रमाणात खेळांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.

भाषणात सचिनने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडुला केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) चा लाभ देण्याची विनंती सकारला केली आहे. याबाबत त्याने हॉकीतील दिग्गज मोहम्‍मद शाहीदचा उल्लेख केला. त्यांनी अखेरच्या दिवसांत आजारपणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. सचिनने म्हटले की, आपण याबाबत विचार करायला हवा की, देशासाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडुंचा आपण योग्य तो सन्मान केला आहे की नाही.

वडिलांचा उल्लेख केला
सचिनने भाषणात वडील रमेश तेंडुलकर यांचा उल्लेखदेखिल केला. माझे वडील प्रोफेसर रमेश तेंडुलकर यांनी मला माझ्या मनाप्रमाणे करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. ही गोष्ट फार गरजेची आहे, असे सचिन यावेळी बोलताना म्हणाला.

सचिनने म्हटले की, देशात असा अनेक समस्या आहेत ज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उदाहरण द्यायचे असेल तर आर्थिक विकास, गरीबी, खाद्य सुरक्षा, आरोग्य सुधार अशा अनेक बाबी आहेत. पण मी फिटनेस आणि खेळाबाबत बोलेल. फिट आणि हेल्‍दी इंडिया हे माझे व्हिजन आहे. देशात साडेसात कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. लठ्ठपणाची समस्याही मोठी आहे. अशा आजारांमुळे देशाचा बराच पैसा आरोग्य सुविधांवर खर्च होतो. हा खर्च आपण कमी करू शकतो. त्यासाठी आपली तब्येत ठीक असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण फिट राहून खेळत राहणे गरजेचे आहे.

ईशान्येकडील राज्यांचे उदाहरण देत सचिन म्हणाला की, या राज्यांची लोकसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत फार कमी आहे. पण देशातील खेळांमध्ये यांची भागीदारी खूप जास्त आहे. मीराबाई चानू, एमसी मेरी कोम, दीपा कार्मकार अशा खेळाडू याचे उदाहरण आहेत. आपल्याला देशात खेळाची संस्कृती रुजवावी लागेल. तरुणांना एखाद्या खेळाची निवड करून त्यात सक्रिय राहावे लागेल. खेळात वयाची सीमा नसते. देशात मॅराथॉनमध्ये धावणाऱ्या सर्वात वयस्कर व्यक्ती परमरेश्‍वरन 100 हून अधिक वयाचे आहेत. स्‍मार्ट सिटीबरोबरच स्‍मार्ट स्‍पोर्ट सिटी बनवायला हवी. त्यासाठी मी अर्थमंत्री, क्रीडा मंत्री यांना वातावरण निर्मिती करण्याची विनंती करेल.

सचिनने म्हटले की, घरात मुलीचा जन्म झाला तर म्हणतात की लक्ष्मी आली. पण तिला लक्ष्मीसारखी वागणूक दिली जात नाही. त्यांना लक्ष्मीसारखे ठेवावे लागेल. तेव्हात त्या पीव्ही सिंधू, मिताली राज, सानिया मिर्झा, सायना नेहवाल सारख्या बनतील. मी पालकांना विनंती करेल की, मुला मुलींना सारखीच वागणूक द्या. आपल्याला कमी वयातच मुलांमधील गुण हेरून त्यांना घडवावे लागेल. तेव्हाच आपल्याला पदक जिंकणे शक्य होईल. देशात गुणांची कमतरचा नाही. योग्य प्रयत्नांतून आपण खेळात यश मिळवू शकतो.

Post a Comment

 
Top