0
गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार, एकटीच राहत असल्‍याने तिघांचे दुष्‍कृत्‍य
वणी-येथील पट्टाचारा नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या ४५ वर्षीय विवाहितेला शेजारी राहणाऱ्या तीघांनी गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी दोघे विधीसंघर्ष ग्रस्त बालक व २७ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे़.
पिडीत विवाहितेचा पती मुलगा रोजगारानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास आहे. ती येथे एकटीच राहत असून तिच्या घराशेजारी राहण्याऱ्या राहुल पाहुनकर वय २७ वर्ष तसेच त्याचे सवंगडी दोघे विधीसंघर्षग्रस्त बालक यांची नजर तीच्यावर पडली. त्यांनी संगनमत करुन दि. १४ डिसेंबरला रात्री १० वाजताच्या सुमारास पिडीतेचे घर गाठले शेजारीच राहणारी मुले असल्याने पिडीतेला कुठलीच शंका आली नाही. मात्र त्यांनी तीला गुंगीचे औषध दिले तीची शुद्ध हरपल्यावर त्या तीघांनी तीच्यावर सामूहिक अत्याचार केला. पिडीता दोन दिवस बेशुद्धावस्थेत होती. दि. १६ डिसेंबरला तिचा दीर घरी आला त्याने तीला उठवून विचारणा केली असता आपल्या सोबत वाईट कृत्य झाल्याचे तिच्या निदर्शनांस आले. यामुळे ती उपचारार्थ दवाखान्यात दाखल झाली. उपचारानंतर तीने वणी पोलिस स्टेशन गाठले त्या तिघा विरोधात तक्रार दाखल केली असून तिघांनी तीच्या पर्समधील पंचेवीस हजार रुपयातील २० हजार रुपये चोरुन नेल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे़. यावरून पोलिसांनी दोन विधी संघर्षग्रस्त बालक राहुल पाहुनकर याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

 
Top