![]() |
इंटरनॅशनल डेस्क- भारतासह 128 देशांनी युनायटेड नेशन्स जनरल असेंबली (UNGA) मध्ये जेरूसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर करण्याच्या निर्णयाचा विरोध केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 डिसेंबरला रात्री उशीरा जेरूसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर केले होते. त्यानंतर या मुद्द्यावरुन गदारोळ निर्माण झाला आहे. वास्तवात, इस्त्राइल आणि पॅलिस्टाईनमधील वाद नवा नाही. दोन्ही राष्ट्रांत मागील 69 वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षात इस्त्राइलने आतापर्यंत इराण, इराक, सिरीया, येमेन, सौदीअरेबिया, जॉर्डन या राष्ट्रांशी युद्ध केले आहे. इस्रायल हा जगातील एकमेव असा देश आहे ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील किमान एका तरी व्यक्तीला तरी लष्करात भरती होणे बंधनकारक आहे, ती व्यक्ती मग पुरुष असो की महिला.
पुरुष आणि महिलांना सारखीच ट्रेनिंग
- 2016च्या जनगणनेनूसार इस्रायलची लोकसंख्या जवळपास 86 लाख आहे.
- इस्रायलची वेबसाईट jewishvirtuallibrary.orgनूसार, देशात सैनिकांची संख्या एकूण 31 लाख आहे. - यामध्ये पुरुषांची संख्या 1,554,186 तर महिला सैनिकांची संख्या 1,514,063 आहे. - या संख्येनूसार इस्रायल जगातील एकमेव असा देश ठरतो ज्यामध्ये पुरुष आणि महिला सैनिकांची संख्या समान आहे. - इतकेच नव्हे तर आर्मी ट्रेनिंगमध्येही इस्रायल पुरुष-महिला असे कोणतेही अंतर ठेवत नाही. पुरुषांचे प्रशिक्षण जेवढे कठीण असते तेवढेच कठोर महिलांचेही प्रशिक्षण असते. अरब देशांत युद्ध सुरु झाल्यापासून महिलाही जॉइन करु लागल्या लष्कर - 1948मध्ये अरब देश आणि इस्रायलमधील युद्धास सुरुवात झाली. तेव्हापासून महिलांनाही लष्करात भरती करणे सुरु झाले. - युद्धादरम्यान लष्करात पुरुषांची संख्या कमी होत गेल्याने याकाळी 20 हजार महिलांना प्रथमच लष्करात भरती केले गेले होते. - या युद्धामध्ये इस्रायल एकटा होता तर दुस-या बाजूला जॉर्डन, लेबनॉन, इजिप्त, सिरीया आणि येमेन अशी राष्ट्रे होती. - या युद्धादरम्यान इस्रायली लष्करामध्ये जेव्हा सैनिकांची कमतरता जाणवायला लागली तेव्हा महिलांनाही लष्करात भरती करण्यात येऊ लागले. - नंतर युद्धामध्ये महिलांनीही पुरुषांच्या बरोबरीने आपली कर्तबगारी दाखवल्यानंतर लष्करात महिलांची संख्या वाढत गेली. प्रत्येकक्षणी रहावे लागते चौकस आणि हत्यारांनी सज्ज - शेजारील राष्ट्र पॅलिस्टाईनच्या दहशतवादी कृत्यामुळे महिला सैनिकांना नेहमी सतर्क रहावे लागते. - इस्रायलमध्ये महिला सैनिक गणवेश परिधान न करताही शस्त्रे बाळगू शकतात. - या कारणामुळे बीचपासून ते पार्ट्यांमध्येदेखील महिला शस्त्र बाळगताना दिसतात. - येथे मुलींना शाळेत असतानाच शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरुन वेळ पडल्यास ते स्वत:च शत्रूंचा सामना करु शकतील. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment