0
डीएनए फिंगरप्रिंट चाचणीचे जनक पद्मश्री डॉ. लालजी सिंह यांचे निधन
वाराणसी-बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. लालजी सिंह यांचे रविवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. डॉ. सिंह भारतात फादर ऑफ डीएनए फिंगर प्रिंट म्हणून ओळखले जात. १९९५ मध्ये त्यांनी सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्सची स्थापना केली. आनुवंशिक विकारपीडितांवर उपचारांसाठी त्यांनी अनेक प्रयोग केले.रविवारी लालजी बाबतपूर विमानतळावर आले असता हृदयविकाराचा झटका आला. कुलगुरू असताना ते केवळ १ रुपया मासिक वेतन घेत होते.

भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. ५ जुलै १९४७ रोजी जौनपूरच्या कलवारी गावात लालजींचा जन्म झाला. १९६२ नंतर त्यांनी बनारस विद्यापीठातून बीएस्सी, एमएस्सी आणि पीएचडी केली.

Post a Comment

 
Top