
नागपूर- इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही राज्यकर्त्यांना पाझर फुटत नाही. मग सरकारचा जनतेला काय उपयोग, असा प्रश्न करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
नागपुरात काढलेल्या हल्लाबोल मोर्चानंतर जाहीर सभेत ते बोलत होते. संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत सरकारचे कोणतेही देणे आम्ही देणार नाही, वीज बिल भरणार नाही, कर्जफेड करणार नाही, हा निश्चय करा, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. सामान्य माणूस व शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली तर जनता सरकार उलथल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या पंतप्रधान मोदींना समस्या ऐकून घेण्यास वेळ नाही. उलट लोकांच्या उद्रेकाचे भावनिक राजकारण ते करत असल्याची टीका पवार यांनी केली.
मनमोहनसिंगांवर घाणेरडे आरोप करताना शरम कशी वाटली नाही- पवार
भाजपची सत्ता येऊन तीन वर्षे झाली. पण, कर्जमाफीचा पत्ता नाही. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. भाजप अतिशय घाणेरडे राजकारण खेळत आहे. भाजपने केवळ सत्ता टिकविण्यासाठी पाकिस्तानसारखा मुद्द पुढे केला आहे. देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न जेसे थे ठेवण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर अतिशय घाणेरडा आरोप करताना शरम वाटायला हवी होती, अशा शब्दांत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केले होते. अय्यर यांनी गुजरात निवडणुकीच्या चर्चेसाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी डॉ. मनमोहनसिंग देखील उपस्थित होते, असा आरोप मोदींनी केला होता. या आरोपावर पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘देश का नेता कैसा हाे, शरद पवार जैसा हो’च्या घाेषणा
मोर्चातकाँग्रेसच्या नेत्यांनी भाषणे केली खरी, परंतु मोर्चेकऱ्यांकडून त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. राहुल गांधींचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी केला, मात्र त्यावरही टाळ्या पडल्या नाहीत. मात्र शरद पवार मंचावर येताच ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’ अशी घोषणाबाजी झाली. काँग्रेस नेत्यांनी पवार यांचा उल्लेख करताच मोठ्या प्रमाणावर टाळ्या वाजल्या.
मोर्चातकाँग्रेसच्या नेत्यांनी भाषणे केली खरी, परंतु मोर्चेकऱ्यांकडून त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. राहुल गांधींचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी केला, मात्र त्यावरही टाळ्या पडल्या नाहीत. मात्र शरद पवार मंचावर येताच ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’ अशी घोषणाबाजी झाली. काँग्रेस नेत्यांनी पवार यांचा उल्लेख करताच मोठ्या प्रमाणावर टाळ्या वाजल्या.
शरद पवार यांच्यासह गुलाम नबी आझाद, अशोक चव्हाण यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधत आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षांचा संयुक्त जनआक्रोश आणि हल्लाबोल मोर्चा काढला. तत्पूर्वी सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमी येथे दर्शन घेतले.
पवारांच्या पायाच्या अंगठ्याचे ऑपरेशन...
दरम्यान शरद पवारांच्या पायाच्या अंगठ्याचे ऑपरेशन झाले आहे. त्यांना प्रकृतीचा किरकोळ त्रासही आहे. असे असताना ही ते हल्लाबोल मोर्चात सहगागी झाले.
दुसरीकडे, विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून खाली या, अशी विरोधकांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधक वेलमध्ये येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राजकारणात पन्नाशी पूर्ण केलेल्या शरद पवार काल मंगळवारी 77 वा वाढदिवस होता. पवारांनी तब्बल 30 वर्षांनी सरकाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. याआधी 1985 मध्ये त्यांनी तत्कालीन राज्य सरकारविरोधात सायकल मोर्चा काढला होता. जळगावातून सुरु झालेला हा सायकल मोर्चा नागपुरात संपला होता.
Post a Comment