0
mom brands four year kid with frying pan | धक्कादायक! आईनेच चार वर्षाच्या मुलीली दिली गरम तव्यावर बसण्याची शिक्षा

हैदराबाद- आईने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीला गरम तव्यावर बसण्याची शिक्षा दिली आहे. हैदराबादमधील एसआर नगरमध्ये ही घटना घडली असून आई व तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ललिता व तिचा साथीदार एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात. ललिता स्वयंपाकी म्हणून काम करते तर तिचा साथीदार वॉचमनचं काम करतो. हॉस्टेलमध्ये खेळतं असताना मुलीकडून एका व्यक्तीच्या लॅपटॉपचं नुकसान झालं. त्या व्यक्तीने याबद्दलची ललिताकडे तक्रार केल्यावर ललिताने चिमुरडीला मारहाण केली. पीडित मुलीला इजा झाली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 
श्रीकाकुलम जिल्ह्यातील इच्छापूरममध्ये रहिवासी असणारे पण सध्या एसआर नगरमधील हॉस्टेलमध्ये राहणारे 25 वर्षीय ललिथा महापात्रा आणि तिचा साथीदार वाय.प्रकाश शनिवारी त्यांच्या चार वर्षाच्या मुलीसह भरोसा सेंटरला गेले. पीडित मुलगी त्यांना सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर भेटली, असं सुरूवातीला त्या दोघांनी सांगितलं. पण नंतर ललिताच त्या मुलीची आई असल्याचं समोर आलं.   
सुरूवातीला ही मुलगी आम्हाला रेल्वे स्टेशनवर सापडली, असं त्यांनी सांगितलं. पण नंतर उलटतपासणी दरम्यान चार वर्षीय मुलगी माझीच असल्याची कबुली त्या महिलेने दिली, अशी माहिती एसआर नगर इन्स्पेक्टर मोहम्मद वाहीदुद्दीन यांनी दिली आहे. 
मुलीला मारत असताना ती गरम तव्यावर पडली आणि भाजली अशी कबुली ललिताने दिली आहे.
मुलीची काळजी घेणं शक्य होत नसल्याने तिला सुरक्षित स्थळी पाठवायचं होतं म्हणून भरोसा सेंटरमध्ये गेल्याचं ललिताने म्हंटलं. तीन दिवसांपूर्वी ललिताने चिमुरडीला मारहाण केली. ललिता सध्या प्रकाशबरोबर राहते आहे पण तिने तिच्या पतीला घटस्फोट दिलेला नाही. ललिताची चार वर्षाची मुलगीही तिच्याबरोबर राहते. तीन वर्षापूर्वी ललिता आणि प्रकाश हैदराबादला आले होते. तेव्हापासून ते हॉस्टेलमध्ये काम करत आहेत. ललिताला मुलीपासून तिची सुटका करून घ्यायची होती, असा दावा शहरातील बाल हक्क कार्यकर्त्याने केला आहे. 
गरम तव्यावर बसवल्याने मुलीला पाठीवर व पायावर जखमा झाल्या आहेत. आईने जबरदस्तीने गरम तव्यावर मला बसवलं असं मुलीने सांगितल्याचं बलाल हक्कुला संघमचे अध्यक्षा अच्युता राव यांनी म्हंटलं आहे.

Post a Comment

 
Top