
अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदान 14 तारखेला होणार आहे. मतदानाच्या एक दिवस आधी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी दावा केला आहे. गुजरातेत काँग्रेस बहुमताने जिंकेल, इतकेच नाही तर निकाल हा सगळ्यांना थक्क करणारा असेल, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "गुजरातचे सेंटिमेंट बदलले आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, काँग्रेसला गुजरातमध्ये पूर्ण बहुमत मिळेल. गुजरात निवडणुकीचा निकाल थक्क करणारा असेल, असेही राहुल यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटले होते.
दरम्यान, गुजरात निवडणुकीकेडे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
Post a Comment