0
हिमाचल प्रदेशात भाजपच्या एकतरफी विजयाचा कार्यकर्त्यांनी तूफान जल्लोष साजरा केला. या राज्यात 5 वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेवर आली आहे. पीएम मोदींचा फॅक्टर हिमाचलमध्ये सुद्धा यशस्वी झाला. मात्र, सीएम पदाचे उमेदवार प्रेम कुमार धूमल यांचा पराभव झाला.
हिमाचल प्रदेशात एकूण 68 जागांपैकी तब्बल 44 जागांवर भाजप पुढे आहे. दुपारपर्यंत येथील निकाल हाती आले तेव्हा भाजपने त्यापैकी 17 जागा जिंकल्या. भाजपचा विजय निश्चित होताच राज्यात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी महिला देखील रस्त्यांवर उतरून आपला आनंद व्यक्त करत होत्या. तर काही ठिकाणी लोकनृत्य सादर करण्यात आले.

Post a Comment

 
Top