![]() |
कुकाणे - नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील गुंड गणेश भूतकर याच्यावर अविनाश चांगदेव बनकर यांनी जुन्या भांडणातून तलवार, कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. रक्तबंबाळ अवस्थेत गणेशला आधी शनिशिंगणापूरच्या हॉस्पिटल नंतर नगरचे खासगी हॉस्पिटल तेथून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा हल्ला टोळीयुद्धातूुन हा प्रकार झाल्याची जोरदार चर्चा शनिशिंगणापूरमध्ये सुरू होती.
हल्ल्याच्या वेळी गोळ्याही झाडल्याची अफवा पसरली होती. ही थरारक घटना बुधवारी पावणे सहाच्या सुमारास घोडेगाव रस्त्यावरील इको बँकेसमोरच्या दत्तू बानकर यांच्या पार्किंगमध्ये घडली. मृत गणेशवर विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शिंगणापूर बंद करून मध्ये दंगलसदृष परिस्थिती निर्माण केली होती. त्यावर फौजदारावर हल्ला करण्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल झाला होती. त्यात त्याला अटक होऊन तो तुरुंगात होता. आता तो जामिनावर सुटलेला होता. या शिवाय त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती समजली.
या घटनेनंतर शनिशिंगणापूरमध्ये प्रचंड धावपळ झाली. घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शिंगणापूरला धाव घेतली. पोलिसांची एक प्लॅटूनच तेथे बोलावण्यात आली होती. रात्री गाावात इतका मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त होता, की परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या प्रकरणी रात्री उिशरा आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी दोन गावठी कट्टेही सापडले आहेत. त्यातून गोळ्या झाडल्या गेल्यात की नाही याबद्दल माहिती स्पष्ट झाली नाही. आरोपी मृत गणेश एकमेकांचे मित्र होते. आिर्थक वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.
|
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment