![]() |
नाशिक - शहरात टवाळखोरांचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे. या कारवाईत काही मुलींकडून थेट पोलिसांना प्रतिप्रश्न करत कारवाईला विरोध केला जात असल्याचे प्रकार घडले आहेत. पुरुष कर्मचाऱ्यांकडून या तरुणींवर कारवाई करण्यास असमर्थ असतात. आता ‘त्या’ मुलींवर कारवाईसाठी महिला पोलिसांचे मर्दानी पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. हे पथक सार्वजनिक ठिकाणी चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाई करणार आहे.
टवाळखोरीचे प्रकार रोखण्यास पोलिसांना काही प्रमाणात यश आले असले तरी काही कारवाईमध्ये पोलिसांना संबंधीत तरुणींकडून विरोध झाल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली होती. मुलांप्रमाणेच मुलीही कशा प्रकारे टवाळखोरीला प्रोत्साहन, हुक्का पार्लर, वाईन शॉप आणि निर्जनस्थळी सिगारेट, मद्य प्राशन करतात याची गंभीर उदाहरणे अधिकाऱ्यांना सांगितली. हे सर्व प्रकार एेकून पोलिस अधिकारी अचंबित झाले. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरांचा वावर असतो. काही मुली शालेय गणवेशावर नको त्या ठिकाणी निदर्शनास येतात. महाविद्यालयीन मुलींच्या तुलनेत शालेय मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यावर नियंत्रणासाठी किंबहुना हे गंभीर प्रकार वेळीच रोखण्यासाठी महिला पोलिसांचे मर्दानी पथक कार्यान्वित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. नुकतेच मुबंईनाका पोलिस ठाण्याचे मर्दानी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. आता सर्वच पोलिस ठाण्यात मर्दानी पथक स्थापन करण्यात येणार आहे.
गंभीर घटना टळणार : प्रेमीयुगुलांचा वाढता वावर घातक ठरू पहात आहे. एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला, खून, बलात्कार, अपहरण, अॅसिड फेकण्याची धमकी आदी गंभीर प्रकार घडले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून दखल घेत पथक कार्यान्वित केले जाणार आहे. कारवाई केलेल्या मुली-मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून समज दिली जाणार आहे.
पालकांनी रहावे सजग
पालकांनी शाळा,महाविद्यालयात मुलीच्या प्रगतीबाबत नियमित शिक्षकांच्या संपर्कात असावे, मुलींच्या मैत्रिणी-मित्रांची वागणूक कशी आहे, याबाबत माहिती घ्यावी. घरी येण्या-जाण्याच्या वेळेवर लक्ष असावे, मोबाइल, लॅपटॉप, संगणक नियमित तपासणी करावी, वागण्यात बदल जाणवत असल्यास वेळीच लक्ष द्यावे. मुलांना भरपूर वेळ द्यावा. -डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment