![]() |
मुंबई- सिनेमागृहाबाहेर अश्लील पोस्टर लावल्याच्या आरोपातून कोर्टाने सिनेमागृहाच्या मालकाची निर्दोष मुक्तता केली. कोर्टाने याप्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
सिनेमाला सेंसर बोर्डने ही परवानगी दिली होती. याचा अर्थ हा सिनेमा पाहाण्यासाठी जनतेला परवानगी असल्याचे कोर्टाने निदर्शनास आणून दिले आहे. याचिकाकर्त्याने सिनेमागृहाच्या मालकावर केलेले सर्व आरोप कोर्टाने फेटाळले आहेत.
या आधारावर सिनेमागृहाच्या मालकाची निर्दोष मुक्तता...
- 'शार्क का आतंक' सिनेमा रिलिज करण्यासाठी सेंसर बोर्डाने परवानगी दिली आहे.
- विशेष म्हणजे सेंसर बोर्डाने यासाठी विशेष समिती स्थापन केली होती. - समितीने ए, यूए अथवा यू प्रमाणपत्र देऊन परवानगी देण्यात आली आहे. - याचा अर्थ असा की, लोक हा सिनेमा पाहू शकतात. - सिनेमागृहावर सिनेमाचे पोस्टरही लावण्यास कोणतीही हरकत नाही. अश्लील पोस्टरमुळे तक्रार दाखल... अश्लील पोस्टर लावल्याने याचिकाकर्ते शैलश यांनी सिनमागृहाचे मालक मोहम्मद सलीम यांच्या विरोधात डीबी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. - थिएटरबाहेर लावण्यात आलेले 'शार्क का आतंक' नामक सिनेमाचे पोस्टर अश्लील असल्याचे शैलेश यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. - पोस्टर पाहून वाहनचालकांचे लक्ष विचलीत होते. तसेच तसेच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते असेही शैलेश यांनी म्हटले होते. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment