0
जालना-अंबड मार्गावर भरधाव आयशरने चिरडले, पिता-पुत्राचा जागेवरच मृत्यू


अंबड- दुचाकीवरुन आपल्याल गावाकडे निघालेल्या पित्रा-पुत्राला भरधाव आयशरने धडक दिल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. जालना-अंबड रोडवर कर्जत पाटीजवळ आज (शनिवार) पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. रमेश एकनाथ कोरडे व सतीश रमेश कोरडे असे या घटनेतील मृतांची नावे आहेत.
रमेश एकनाथ कोरडे (40,लोणगाव,ता.भोकरदन) हे मेंढपाळ असून त्यांचा मुलगा सतीश (19) याने गेल्या काही दिवसांपाूसन अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे मेंढ्या चरण्यासाठी आणल्या होत्या. सतीश आजारी असल्याने वडील रमेश कोरडे त्याला गावाकडे घेऊन जाण्यासाठी शुक्रवारी रात्री िचंचखेड येथे आले होते. मात्र रात्री उशीर झाल्याने त्यांनी पहाटे लवकर लोणगाव येथे जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ते चिंचखेड येथून निघाले. जालन्याकडे येत असताना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव आयशर (एम.एच.21 एक्स 1468) ने ‍त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक बसल्याने पाठीमागे बसलेला सतीश खाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला तर गाडी चालवत असलेल्या रमेश यांच्या अंगावरुन आयशर गेल्याने ते चिरडले गेले. यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाल्याचे कळताच परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली. तर घटनेची माहिती मिळताच अंबड पोिलस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

Post a Comment

 
Top