मुंबई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) भागातील आझाद मैदानाजवळ असलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी आज सकाळी हल्ला करत तोडफोड केली. हल्ला करताना कार्यालयातील काचा, फर्निचर, खुर्च्या, टेबलाची नासधूस केली. तसेच तेथील काही कर्मचा-यांना मारहाण केली. दरम्यान, हा हल्ला केल्यानंतर मनसेने याची चार तासांनी जबाबदारी स्वीकारली. होय, हा हल्ला आम्ही केला असून, मनसेने काँग्रेसवर केलेला हा सर्जिकल स्ट्राईक आहे. 'ईट का जवाब पत्थर से देंगे' असे टि्वट करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनसेच्या या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. विचारांची लढाई विचाराने लढायला हवी. मनसेची ही गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे. काँग्रेसचे नेते हल्ला झालेल्या कार्यालयात दाखल झाले आहेत. या हल्ल्याची सविस्तर माहिती घेऊन ते पोलिसांत मनसेविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हे काँग्रेसच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये गेल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
गेल्या काही दिवसापासून काँग्रेस आणि मनसेत वाद सुरू होता. मनसेने एलफिन्स्टन येथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर राज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी रेल्वे परिसरात असलेल्या फेरीवाल्यांना रेल्वेने 15 दिवसात फेरीवाल्यांना हटवावे अन्यथा मनसे स्टाईलने त्यांना हटवू असे राज यांनी सुनावले होते. यानंतर मनसेने अवैध फेरीवाल्यांविरोधात मोहिम उघडली होती.

यादरम्यान, मनसे व फेरीवाल्यांत मारहाण झाली होती. मात्र, हे फेरीवाले उत्तर भारतीय असून, त्यांना संजय निरूपम पाठीशी घालत होते. संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चाही काढला होता. यानंतर संजय निरूपम आणि मनसे यांच्यातील वाद वाढत गेला. फेरीवाल्यांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली होती. त्यांच्यावर आजही उपचार सुरू आहेत. त्याचाच राग व बदला म्हणून मनसेने हा हल्ला केला आहे.
Post a Comment