0
शिंदखेडा नगरपंचायतीत भाजपची सत्ता, विद्यमान नगराध्यक्षासह 9 जागांवर विजय

धुळे-जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराद्यक्षपदी भाजपच्या रजनी अनिल वानखेडे 3333 मतांनी विजयी झाल्या. भाजपला 9 काँग्रेसला 6 तर समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या.
शिंदखेडा नगरपंचायतीची मतमोजणी आज (गुरूवार) झाली. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. भाजपचे उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. साडेअकरा वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले. नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी त्यात भाजपच्या पारड्यात नगराध्यक्षांसह दहा जागा मिळाल्या.
शहाद्यात एमआयएमचा विजय...
शहादा येथील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएम पक्षाचे वसीम सलीम तेली विजयी झाले. त्यांनी नईम मिस्तरी यांचा पराभव केला. वसीम मिस्तरी यांना 1653 मते मिळाली तर नईम मिस्तरी यांना 134 मते मिळाली.

Post a Comment

 
Top