
यावल- तालुक्यातील दहिगाव येथे ऊसाच्या ट्रक्टरमागे धाऊन ट्रॉलीतून ऊस काढतांना एका नऊ वर्षीय मुलीचा अपघात होऊन जागीच ठार झाली. ही घटना आज (शुक्रवारी) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. नंदनी चंदू जळवर (रा.साकेगाव, ता. भुसावळ) असे मृत मुलीचे नाव आहे. ती आजी-आजोबाकडे शिक्षण घेण्यासाठी राहत होती.
दहिगाव–मोहराळा रस्त्यावरून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राजेंद्र जुलाल पाटील (रा. दगडी सबगव्हान, ता. पारोळा) हे त्याच्या ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. 18 एन. 3399 व्दारे एक ट्रॉली व त्या मागे बैलगाडीत ऊस भरून दहिगावातून यावलकडे येत होते. तेव्हा ऊसाच्या ट्रॉलीतून ऊस काढण्याकरीता नंदनी चंदू जळवर धावली व ट्रॉलीतून ऊस काढतांना ती पडली आणि ट्रॉलीच्या मागे जोडलेल्या बैलगाडीत सापडून जागीच ठार झाली घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव एकत्र झाला व पोलिसांनी देखील धाव घेतली नागरीकांनी ट्रक्टर हलवण्यास मज्जाव केला मात्र, सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश तांदळे, हवालदार महेबूब तडवी, सिकंदर तडवी, राहूल चौधरी यांनी जमावास शांत केले मृत नंदनीस यावल ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदना करीता आणण्यात आले आहे तर ट्रक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आजी आजोबांकडे शिकायला होती चिमुरडी...
- नंदनी चंदू जळवर ही मुळ साकेगाव ता. भुसावळ येथील रहिवासी असुन आई
- वडील पुण्याला कामा करीता स्थलांतर झाले आहे तर नंदनीस शिक्षणा करीता आईच्या आई
- वडील आजी आजोबांकडे शिकायला ठेवले होते ती इयत्ता ३ रीची विद्यार्थीनी होती.
- नंदनी चंदू जळवर ही मुळ साकेगाव ता. भुसावळ येथील रहिवासी असुन आई
- वडील पुण्याला कामा करीता स्थलांतर झाले आहे तर नंदनीस शिक्षणा करीता आईच्या आई
- वडील आजी आजोबांकडे शिकायला ठेवले होते ती इयत्ता ३ रीची विद्यार्थीनी होती.
Post a Comment