0
काेहलीचा द्विशतकाचा विश्वविक्रम! भारतीय संघाने 7 बाद 536 धावांवर डाव केला घाेषित

नवी दिल्ली- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार विराट काेहलीने (२४३) एकापाठाेपाठ एका विक्रमाला गवसणी घालण्याची अापली माेहीम कायम ठेवली. यातून त्याने रविवारी श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात शानदार द्विशतक ठाेकले. त्याचे हे विक्रमी द्विशतक ठरले. काेहलीने १७ महिन्यांनंतर सहावे द्विशतक ठाेकले. यासह त्याने कर्णधाराच्या भूमिकेत सर्वाधिक पाच द्विशतके ठाेकणाऱ्या विंडीजच्या ब्रायन लाराचा विक्रम माेडीत काढला.

काेहलीच्या या झंझावाताच्या बळावर यजमान भारताने दुसऱ्या िदवसअखेर ७ बाद ५३६ धावांवर अापला पहिला डाव घाेषित केला. यादरम्यान युवा फलंदाज राेहित शर्माने (६५) शानदार अर्धशतकी खेळी केली. अाता प्रत्युत्तरात श्रीलंकेची पहिल्या डावातील सुरुवात निराशाजनक ठरली. या टीमने दिवसअखेर ३ बाद १३१ धावा काढल्या. ४०५ धावांनी पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेकडून माजी कर्णधार मॅथ्यूज (५७) अाणि कर्णधार चांदिमल (२५) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत. भारताकडून पहिल्या डावात माे. शमीसह रवींद्र जडेजा अाणि ईशांत शर्माने गाेलंदाजी करताना प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

असा गाजला दुसरा दिवस
तिसऱ्या कसाेटीचा दुसरा दिवस काहीशा घटनांनी चांगलाच गाजला. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा अाता चांगलाच एेरणीवर अाला अाहे. याचाच अाधार घेत श्रीलंकेच्या खेळाडूंनी प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास असल्याचे कारण देत तीन ते चार वेळा सामना राेखण्यास भाग पाडले. दरम्यान, श्रीलंकन खेळाडूंनी मास्क घालून खेळी केली. त्यामुळेच काेहलीने वैतागून अापला पहिला डाव घाेषित केला. याच नरम-गरमच्या वातावरणामध्ये काेहलीने शानदार द्विशतक ठाेकले अाणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

हाराकिरीचा काेहलीला फटका
प्रदूषणाचा बागुलबुवा करताना पाहुण्या श्रीलंकन टीमच्या खेळाडूंनी हाराकिरीची खेळी केली. याचाच माेठा फटका काेहलीला बसला. सातत्याच्या तक्रार अाणि सामन्यातील प्रत्ययामुळे काेहलीची एकाग्रता भंग पावली अाणि ताे पायचीत हाेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, त्याचा त्रिशतकाचा मानस हाेता. मात्र, त्याला द्विशतकावर समाधान मानावे लागले. त्याने २८७ चेंडूंचा सामना करताना २५ चाैकारांच्या अाधारे २४३ धावांची खेळी केली.
तब्बल १४ वेळा ताेडला अापलाच विक्रम
काेहलीने २४३ धावांची कसाेटी करिअरधील सर्वाेत्तम खेळी करताना १४ वेळाच विक्रमाला माेडीत काढले. अशा कामगिरीमध्ये त्याने वेंगसरकरांना (११ वेळा) मागे टाकले.
मालिकेत दाेन द्विशतके ठाेकणारा दुसरा भारतीय
काेहलीने एकाच मालिकेत दाेन द्विशतके ठाेकणारा दुसरा भारतीय फलंदाज हाेण्याची नाेंद केली. असा पराक्रम विनू मंकड यांनी केला हाेता.
बीसीसीअायची चाैकशी
दिल्लीत प्रदूषणाचा मुद्दा गाजत अाहे. अशा परिस्थितीमध्ये तिसरी कसाेटी या ठिकाणी काेणत्या कारणास्तव अायाेजित करण्यात अाली,असा प्रश्न श्रीलंकन क्रिकेट मंडळाने उपस्थित केला. या मंडळाने यावर प्रश्नावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून उत्तरही मागितले अाहे.

Post a Comment

 
Top