नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधी शुक्रवारी प्रथमच काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीचे (CWC) अध्यक्ष म्हणून सहभागी होतील. यात गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जोरदार कामगिरीसोबतच भविष्यात पक्षावर होणारे परिणाम, 2जी बाबत कोर्टाचा निर्णय यासह इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर राहुल गांधींच्या टीममध्ये राजस्थानच्या सहा नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री भंवर जितेंद्र सिंह आणि सीपी जोशींसारख्या दिग्गज नेत्यांना कोअर टीममध्ये स्थान मिळू शकते.
नव्या टीमच्या हालचाली..
- राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर त्यांच्या नव्या टीमच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राहुल गांधींच्या टीममध्ये राजस्थानची महत्त्वाची भूमिका असेल.
- गहलोत, जितेंद्र आणि जोशी यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष राष्ट्रीय स्तरावर घेऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात इतर राज्यांत काँग्रेसची सत्ता स्थापन होण्यास मदत होऊ शकेल.
- गुजरात निवडणुकीत गहलोत यांच्यासह अनेक राज्यांचा प्रभार जोशींकडे आणि तरुण नेते सक्रिय होणे हे सर्व याचेच संकेत असल्याचे म्हटले जात आहे.
या नेत्यांना मिळू शकते नवी जबाबदारी
सीपी जोशी : माजी केंद्रीय मंत्री सीपी जोशी यांच्याकडे आधीच अनेक राज्यांचा प्रभार आहे. पण आता राष्ट्रीय स्तरावर ते अधिक सशक्त होतील. राजस्थान क्रिकेट असोसिएशनमधून ललित मोदींना दूर करण्यात त्यांना यश आले आहे. जोशींना याचा फायदाही मिळेल. जोशी राहुल यांचे नीकटवर्तीयही समजले जातात. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढू शकते.
ज्योती मिर्धा : महिला म्हणून नागौरच्या माजी खासदार ज्योती मिर्धा यांच्या नावाचा समावेश केला जाऊ शकतो. आक्रमक नेत्या अशी ज्योती यांची ओळख आहे. पक्षातही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर मोहन प्रकाश, जुबेर खान, हरीश चौधरी आधीच राष्ट्रीय पातलीवर कामकरत असून पूर्वीप्रमाणेच ते राहुल यांच्या टीममध्ये काम करत राहतील.
अशोक गहलोत : गहलोत यांना ज्याप्रकारे गुजरातमध्ये बाजपविरोधात आक्रमक रणनिती आखण्यात यश मिळाले आहे, त्यामुळे ते काँग्रेसचे नवे चाणक्य असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गहलोत यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीतही तिकिट वाटपात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गुजरात निवडणुकीनंतर ते राहुल यांच्या आणखी जवळ आले आहेत.
भंवर जितेंद्र सिंह : माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहही राहुल गांधींचे नीकटवर्तीय समजले जातात. आतापर्यंत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी नव्हती. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत तिकिट वाटपाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. जितेंद्र सिंह यांचे सासरे आणि हिमाचल प्रदेशचे रहिवासी विजेंद्र सिंह आणि राजीव गांधी यांच्यात शाळेपासूनच मैत्री होती. भंवर यांना सरचिटणीस बनवून त्यांना काही पक्षांची जबाबदारी दिली जाऊ शकते.
आगामी काळात कुठे होताहेत निवडणुका..
- मेघालय, नगालँड आणि त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाळ मार्च 2018 मध्ये संपत आहे. या तीन राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी-मार्च मध्ये होण्याची शक्यता आहे.
- कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ मे 2018 मध्ये संपत आहे. याठिकाणी एप्रिलमध्ये निवडणुका होऊ शकतात. कर्नाटकमधील सत्ता वाचवण्यासाठी काँग्रेसला रणनिती आखावी लागणार आहे.
- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण होतोय. येथे डिसेंबर 2018 पर्यंत निवडणुका होतील. ही तिन्ही राज्ये सध्या भाजपच्या ताब्यात आहेत.
- कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ मे 2018 मध्ये संपत आहे. याठिकाणी एप्रिलमध्ये निवडणुका होऊ शकतात. कर्नाटकमधील सत्ता वाचवण्यासाठी काँग्रेसला रणनिती आखावी लागणार आहे.
- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण होतोय. येथे डिसेंबर 2018 पर्यंत निवडणुका होतील. ही तिन्ही राज्ये सध्या भाजपच्या ताब्यात आहेत.
Post a Comment