
श्रीरामपूर- बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात श्रीरामपुरातील पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतांमध्ये नितीन सुधाकर सोनवणे, शिवाजी झुंबरनाथ ढोकचौळे (वय ३०, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सचिन रघुनाथ तुपे (वय २९), भारत विश्वनाथ मापारी (वय २५, दोघेही रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर), सुभाष बाळासाहेब शिंदे (वय ३२, ब्राम्हणगाव वेताळ, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. तर पीयुष घनश्याम पांडे (रा. भैरवनाथनगर) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
देवळाली प्रवरा-नरसाळी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीत सहभागी झाले होते. वाढदिवस व जेवण आटोपून ते घरी श्रीरामपूरकडे स्विफ्ट डिझायर कारमधून परतत असताना रात्री १२.३० च्या सुमारास बेलापूर खुर्द येथील महादेव मंदिरासमोर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यात गाडी पाच सहा पलट्या खाऊन समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरवर आदळली. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणारी इंडिका कारही स्वीफ्ट कारवर येऊन आदळली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. तसेच बेलापूर पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, अर्जुन पोकळे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वांना गाडीतून बाहेर काढले व उपचारासाठी येथील कामगार रुग्णालयात पाठविले.
दत्तनगरला वाढदिवस
अपघातातील मृतांच्या भोसले नावाच्या एका मित्राचा बुधवारी वाढदिवस होता. रात्री दत्तनगर येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर हे सर्व जण देवळाली-नरसाळी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पार्टी करण्याकरिता गेले होते. मध्यरात्रीनंतर परतताना हा अपघात घडला.
अपघातातील मृतांच्या भोसले नावाच्या एका मित्राचा बुधवारी वाढदिवस होता. रात्री दत्तनगर येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर हे सर्व जण देवळाली-नरसाळी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पार्टी करण्याकरिता गेले होते. मध्यरात्रीनंतर परतताना हा अपघात घडला.
Post a Comment