![]() |
नागपूर-दुचाकीवरील संतूलन बिघडल्याने पेंच कालव्यात कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या चौथ्या व्यक्तीचाही कालव्यात बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेतील चारही जण एकाच कुटुंबाचे सदस्य असल्याची माहिती आहे. गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता ही घटना घडली. कमलेश शांतीलाल जैन(27), त्यांची पत्नी अंजली कमलेश जैन(25), प्रियंका जैन (23)आणि आशिष जैन (20)अशी मृतांची नावे आहेत.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, मनसर परिसर येथे राहणा-या जैन कुटुंबातील 5 जण गुरुवारी पेंच प्रकल्प पाहण्यासाठी दुचाकीने गेले होते.
- कमलेश, अंजली आणि प्रियंका एका दुचाकीवर होते तर आशिष आणि त्यांची बहिण दुस-या दुचाकीवर स्वार होते. - मात्र परतत असतानाच कमलेश यांचे दुचाकीवरील संतूलन बिघडले आणि तिघांसह त्यांची बाईक सरळ कालव्यात जाऊन पडली. मागून येत असलेल्या आशिषने हे पाहिले व त्यांना वाचवण्यासाठी त्यानेही कालव्यात उडी मारली. मात्र तोदेखील वाहून गेला. - तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अंजली आणि प्रियंका यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आशिष आणि कमलेश यांचे मृतदेह अद्याप हाती लागले नसून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती आहे |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment