0
पीओकेत जाऊन पाकच्या 3 सैनिकांना ठार मारले, शस्त्रसंधी उल्लंघनाचे भारताकडून असेही प्रत्युत्तर
श्रीनगर - भारतीय सैनिकांनी लाइन ऑफ कंट्रोल पार करून पाकव्याप्त काश्मिरात धडकून पाकिस्तानच्या 3 सैनिकांना ठार मारले आहे. याच कारवाईत पाकिस्तानचा आणखी एक सैनिक जखमी झाला आहे. गुप्तचर सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने शनिवारी केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनास भारताने असे प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने केलेल्या त्या गोळीबारात भारताचे 4 जवान शहीद झाले होते. तर दुसरीकडे, मंगळवारी काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या एनकाउंटरमध्ये सुरक्षा रक्षकांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

पाकच्या ISPR ने दिला दुजोरा
- पाकिस्तानी मीडियाने इंटर सर्विस पब्लिक रिलेशन्सचा दाखला देत या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला आहे. भारतीय सैनिकांनी सोमवारी एलओसी ओलांडून प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची कबुली त्यांनी दिली. 
- ही घटना घडली तेव्हा पाकिस्तानी तुरुंगात बंद असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांचे कुटुंबीय पाकिस्तानात त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले होते. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, शनिवारी पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दिशेने केलेल्या फायरिंगमध्ये 4 भारतीय जवान शहीद झाले. त्यामध्ये एका मेजरचा सुद्धा समावेश होता. त्याच गोळीबारास भारताचे हे प्रत्युत्तर आहे.
- पाकिस्तानी दैनिक द डॉन च्या वृत्तानुसार, रावलकोटच्या रुखचकरी सेक्टरमध्ये सोमवारी ही घटना घडली आहे

Post a Comment

 
Top