![]() |
मुंबई- मुंबईतील पॉश भाग असलेल्या लोअर परेलमध्ये मध्यरात्री मोजोस लॉउंज, बार अॅंड रेस्टोरेंटला भीषण आग लागली. यात 14 लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडणा-यांत महिलांची संख्या जास्त आहे. तर डझनाहून अधिक लोक जखमी झाले आहेत.या अपघातात दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. कविता पियूष धाराणी आणि तेजल भावीण गांधी असे या दुर्देवी बहिणीची नावे आहेत.
खरं तर कविता आणि तेजल या बहिणी 31 डिसेंबरच्या पार्टीचं प्लॅनिंग करण्यासाठी आपल्या काही नातेवाईंकांसह मोजो हॉटेलमध्ये डिनरला गेले होते. डिनर करता करता 31 डिसेंबरला पाचगणीला जायचे ठरले. मात्र, त्यानंतर काही क्षणात रेस्टांरंटला आग लागली. दरम्यान, कुटुंबांतील इतर लोक मोजो हॉटेलातून धावत वन अबाव्ह या हॉटेलात धावत गेले. आग इतकी भीषण होती की कोणाला काय करायचं ते कळत नव्हत. आगीच्या धुराने गुदमरू लागलेल्या या दोघी बहिणी जीव वाचविण्यासाठी हॉटेलच्या टॉयलेटमध्ये घुसल्या. तेथून तेजलने कविताच्या पतीच्या आपल्या भावोजीला फोन करून सांगितले.
दरम्यान, त्यांचे नातेवाई सर्व जण बाहेर पडले व या दोघी बहिणी आतच राहिल्या व त्या मिनिटांतच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण धारणी आणि गांधी कुटुंबासह घाटकोपर पूर्व विभागात शोककळा पसरली आहे. या घटनेला जबाबदार अधिकारी आणि हॉटेल मालकांवर कारवाईची मागणी नातेवाईक आणि स्थानिक नगरसेवक पराग शहा यांनी केली आहे.
|
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment