0
श्रीमंतांना फसवण्यासाठी स्वत:ला फिट ठेवते तरूणी; ब्यूटी पार्लचा खर्च दरमहा 30 हजार
सुरत- हितेश रबारी (देयाई) आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी 6 महिन्यानंतर त्याची गर्लफ्रेन्ज ज्योतिविरोधात केस दाखल केली आहे. परंतु, आद्याप तरूणीला अटक कऱण्यात आलेली नाही. सदर तरूणी ही हितेशची गर्लफ्रेन्ड होती आणि ती त्याला ब्लॅकमेल करत होती असा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमंताना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी ती सजून धजून राहत होती, तसेच स्वत: फिट ठेवण्यासाठी ती जिम आणि डान्स क्लासला देखील जात होती. अत्यंत हायाफाय लाईफस्टाइल जगणाऱ्या आरोपी तरूणीचा ब्यूटी पार्लरचा महिन्याचा खर्च 30 हजार रूपये होता.

ज्योतिने हितेशच्या क्रेडिट कार्डवर विदेशात केली खरेदी....
रेसकोर्स रोड येथील करोडपति हितेश रबारी याने 22 जून 2017 च्या रात्री नवसारी येथील फार्म हाऊसवर गोळी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूसाठी कुटुंबीयांनी हितेशची मैत्रिण ज्योतिला जबाबदार धरले होते. ज्योति हितेशला ब्लॅकमेल करत होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता.
- पोलिसांनी ज्योतिविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. सध्या ज्योति फरार असून पोलिसांनी तिच्या विरोधात नोटिस जारी केली आहे.
- पोलिस हितेशच्या बँक खात्यांचीही चौकशी करत आहेत. ज्योतिने विदेश दौऱ्यात हितेशच्या क्रेडिटकार्डने खरेदी केली असल्याची माहिती मिळाली आहे.
- पोलिसांनी हितेशचे मोबाईल कॉल्स आणि मेसेज डिटेल्सची फॉरेंसिक चौकसी केली, यात काही व्हिडिओ क्लिप देखील मिळाल्या आहेत. त्या क्लिपिंगच्या आधारावरच ज्योति हितेशला ब्लॅकमेल करत होती असा पोलिसांना संशय आहे. ज्योतिला हितेशशी लग्न करायचे होते असेही पोलिसांना समजले आहे.

दोस्ती रेस्टॉरंटवरून मॉलवर जात होती...
- पोलिसांनी ज्योतिला यासंबंधी नोटिस पाठवली, तेव्हा ज्योति फरार झाली. तेव्हा तिची घातक मॉडस आपरेंडीची माहिती समोर आली आहे.
- श्रीमंतांना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी ज्योती जिमचा आधार घेत होती. पीपलोदच्या जिममध्ये येणाऱ्या श्रीमंतांसमोर ज्योती टाईट कपडे घालून येत होती. यानंतर गप्पांतून त्यांच्याशी मैत्री करत होती. या मैत्रीचा प्रवास जिममध्ये सुरू होऊन रेस्टॉरेंट, कॉफी हाऊस ते मॉलपर्यंत जात होता.
- आधी गप्पांद्वारे मैत्री करत होती, नंतर घरापर्यंत पोहोचत होती. या कामात अतिशय मास्टर झाली होती. केवळ विवाहित पूरूषांनाचा ती आपल्या जाळ्यात ओढते. त्यामुळे घरात तिच्यावरून वाद सुरू होत होते. नंतर ती या भांडणाचा फायदा घेत जाळ्यात अडकलेल्या पूरूषांना ब्लॅकमेल करत होती.
- आपल्या जाळ्यात अडकलेल्या पूरूषांद्वारे ती मॉडलिंगचे काम शोधत होती. विशेषकरून व्यावसायिंकांना फसवण्यात ती माहिर आहे. ज्योतिला वेग-वेगळ्या ठिकाणी पाहण्यात आले आहे.
- 4 वर्षांपूर्वी या प्रकरारे सिटीलाइटचा एक व्यावसायिक ज्योतिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला होता. शेवटी त्यानेही आत्महत्या केली.

Post a Comment

 
Top