
पुणे- चंदननगर परिसरात भर रस्त्यावर रात्री तीन तरुणांकडून एका तरुणीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नगररोड पाचवा मैल उप्पाला हॉटेल शेजारील ही घटना असून एका नागरिकाने मोबाइल कॅमेर्याने हा व्हिडिओ शूट केला आहे.
तिघे तरुण मद्यधुंद होते. ते तरुणीला शिविगाळ करून मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पीडित तरुणी कोण, तिघे तरुण तिला का मारहाण करत होते, याबाबत माहिती समजू शकली नाही. चंदननगर पोलिस या तरुणांचा कसून शोध घेत आहेत.
Post a Comment