0
राहुल यांचा मोदींना प्रश्न- शिक्षणावरील खर्चात गुजरात देशात 26व्या स्थानावर का? तरुणांची काय चूक?

नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीत प्रचारादरम्यान राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. शनिवारी राहुल यांनी मोदींना ट्विटरवर चौथ प्रश्न विचारला. राहुल म्हणाले- सरकारी शिक्षणावरील खर्चात गुजरात देशात 26व्या स्थानावर का आहे? तरुणांनी कोणती चूक केली? राहुल '22 सालों का हिसाब, गुजरात मांगे जवाब' या नावाने ट्विटरवर सिरीज चालवून मोदींना उत्तर मागत आहेत. तथापि, गुजरातेत काँग्रेस 22 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत निवडणुका होत आहेत. निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल.

राहुल यांनी आतापर्यंत मोदींना विचारले 4 प्रश्न
- "सरकारी शाळा-कॉलेजच्या किमतीवर केला शिक्षणाचा व्यापार, महागड्या फीसमुळे बसला प्रत्येक विद्यार्थ्याला मार, New India चे स्वप्न कसे होणार साकार?"
- "सरकारी शिक्षणावरील खर्चात गुजरात देशात 26व्या स्थानावर का? तरुणांनी कोणती चूक केली?"
तिसरा प्रश्न- 30 नोव्हेंबर
- "2002-16 दरम्यान 62,549 कोटींची वीज खरेदी करून 4 खासगी कंपन्यांची तिजोरी का भरली?"
- "सरकारी वीज कारखान्यांची क्षमता 62% घटवून खासगी कंपनीतून 3 रु./ युनिटची वीज 24 रुपयांनी का खरेदी केली? जनतेचा पैसा का उडवला?"
दुसरा प्रश्न- 29 नोव्हेंबर
- "1995 मध्ये गुजरातवर कर्ज-9,183 कोटी. 2017 मध्ये गुजरातवर कर्ज- 2,41,000 कोटी. म्हणजेच प्रत्येक गुजराथीवर 37,000 रुपयांचे कर्ज."
- "तुमच्या चुकीच्या आर्थिक नियोजनाची आणि पब्लिसिटीची शिक्षा गुजरातच्या जनतेने का भोगावी?"

पहिला प्रश्न- 28 नोव्हेंबर
- "2012 मध्ये वचन दिले होते की, 50 लाख नवे घर देऊ. 5 वर्षांत बनवली 4.72 लाख घरे."
- "पंतप्रधानांनी आता सांगावे की, हे आश्वासन पूर्ण व्हायला आणखी 45 वर्षे लागतील का?"

Post a Comment

 
Top