0
अकोल्‍यात 21 तासांत 2 खून, एक दंगल; जागेच्या वादातून एकाची तलवारीने हत्‍या

अकोला-शहरात २१ तासांत दोन खून एक दंगल घडली. एका घटनेत गोरक्षण रोडवर भीम कायदा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत निंगोट यांच्यावर चाकुने हल्ला करण्यात आला तर दुसऱ्या घटनेत जुने शहरातील बाळापूर नाका येथे जागेच्या वादातून युवकाचा कुऱ्हाड आणि तलवारीने वार करून खून केला. याच दरम्यान अकोट फैलमध्ये दोन गटांत दंगल उसळली होती. या घटनांमुळे अकोलेकर भयभीत झाले असून, कायदा आणि सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माधवनगर येथील गजानन विहार अपार्टमेंट येथील रहिवासी प्रशांत निंघाेट यांच्यावर गुरुवारी (ता.१४) रात्री सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान केशवनगर परिसरात चार ते पाच जणांनी चाकूने हल्ला चढवून हत्या केली.प्रशांत निंगोट यांच्यावर जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु, त्याचे नेमके कारण काय? याचे कारण अद्यापही समाेर आले नाही.२१ तासांतील हा दुसरा खून असून, शहरात दहशतीचे वातावरण आहे.
भीम कायदा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत निंगोट हे गुरुवारी रात्री त्यांच्या घरात असताना त्यांना फाेन आला. त्यामुळे ते घराबाहेर आले. घरापासून काही अंतरावर केशवनगरातील रिंगराेड परिसरात आल्यावर चार ते पाच जणांनी अचानक त्यांच्यावर चाकुने हल्ला केला. हल्यात आराेपींनी प्रशांत निंगोट यांच्या पाेटावर आणि छातीवर चाकूने वार केले तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे सहकाऱ्यांनी त्यांना जिल्हा सर्वाेपचारमध्ये दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रशांत निंघाेट हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रयाेगशाळा सहाय्यक या पदावर कार्यरत हाेते. त्यांच्या पत्नीही विद्यापीठात नोकरीवर आहेत. यापूर्वी ते जुने शहरातील भीमनगर भागात राहत हाेते. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर भीमनगर परिसरातील नागरिक माेठ्या संख्येने जिल्हा सर्वाेपारमध्ये धावून आले. वृत्तलिहिस्ताेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. दरम्यान, आराेपींमध्ये प्रेम, आकाश आणि आशु ही नावे समाेर आली असून, पाेलिसांनीही त्याला दुजाेरा दिला. २१ तासांतील हा दुसरा खून असून, शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशांत निंगोट यांचा खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला,याचा पोलिस शोध घेत आहेत.

Post a Comment

 
Top