![]() |
नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 93 व्या जन्मदिनाचा मुहुर्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील पहिल्या वाहनचालकविरहित मेट्रोचे उद्घाटन केले. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने नोएडा ते दक्षिण दिल्ली दरम्यान ही रेल्वेची नवी मजेंटा लाईन तयार केली आहे. मोदी सोमवारी दुपारनंतर नोएडा येथील बॉटिनिकल गार्डन मेट्रो स्टेशनवर पोहचतील. त्यानंतर नोएडा येथील एका कार्यक्रमात सामील होतील. या कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मात्र तयारी केलेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दोन दिवसापुर्वी नोएडाचा दौरा केला आहे.
नॉयडाहून कालकाजीला पोहचवेल नवी मेट्रो
- डीएमआरसीने नॉयडाच्या बॉटनिकल गार्डनहून दक्षिण दिल्लीतील कालकाजी मंदिरापर्यंत नवी 13 किलोमीटर लांबीची नवी लाईन तयार केली आहे. याला मजेंटा मेट्रो लाईनचे नाव देण्यात आले आहे.
- मजेंटा लाईनची लांबी नॉयडापासून जनकपुरी पश्चिमपर्यंत जवळपास 38 किलोमीटर आहे. कालकाजीच्या पुढे काम सुरु आहे. हौज खास स्टेशनवर मेट्रो बदलुन यलो लाईनने गुडगांवपर्यंत सहज जाता येईल.
19 मिनिटाच्या प्रवासात असतील 9 स्थानके
- नव्या मजेंटा लाईनवर बॉटनिकल गार्डन, ओखला बर्ड सेंचुरी, कालिंदी कुंज, जसोला विहार, शाहीन बाग, ओखला विहार, सुखदेव विहार, ओखला एनएसआइसी, कालकाजी मेट्रो स्टेशन ही स्थानके असतील. 19 मिनिटात 13 किलोमीटरचा प्रवास आता करता येणार आहे.
- ब्ल्यू लाईन मेट्रोने नोएडाहून मंडी हाऊस आणि तेथून कालकाजीला पोहचण्यास 41 मिनिटे लागतात. कार किंवा दुचाकीवरुन कालकाजीला जाण्यास 52 मिनिटे लागतात. नव्या लाईनमुळे प्रवाशांची 45 मिनिटे वाचणार आहेत.
मागील आठवड्यात झाला होता अपघात
- कालिंदी कुंज डेपो येथे मंगळवारी मेजेंटा मेट्रोचा अपघात झाला होता. स्वच्छतेसाठी नेण्यात येणारी ही मेट्रो ब्रेक न लागल्याने भीतींला धडकली होती. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment