![]() |
पाटणा/ रांची- बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्यातील एका खटल्यात माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना दोषी घोषित करण्यात आले आहे, तर जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 7 जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
देवघर ट्रेझरी (कोषागार) मधून अवैध रीतीने 1991 ते 1994 दरम्यान 6 बनावट दस्ताऐवजच्या माध्यमातून 89,04,413 रुपये काढण्यात आले होते, याप्रकरणी रांची सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने आज (शनिवार) हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुनावणीला लालूंसह सर्व 22 आरोपींना कोर्टात उपस्थित होते.
कोर्टाने निर्णय दिल्यानंतर पोलिसांनी लालूप्रसाद यादव यांनी अटक केली आहे. लालूंच्या रवानगी बिरसा मुंडा तुरुंगात करण्यात आली आहे. यावेळी लालू समथर्कांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
कोर्टाने माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह ध्रुव भगत आणि विद्या सागर यांची निर्दोश मुक्तता केली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर रांची पोलिसांनी होटवार येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती तुरुंगाबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे. संपूर्ण परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला दाहे. लालूंना कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्यांना जामिनासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.
राजद नेत्यांची आगपाखड..
निकालानंतर राजद नेत्यांची आगपाखड सुरु झाली आहे. आमच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. लालू प्रसाद यादव यांना गोवण्यात आल्याचा आरोप राजद नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, लालूप्रसाद आणि त्यांचे पुत्र तेजस्वी सकाळीच कोर्टात पोहोचले होते. नंतर ते उपस्थिती दर्शवून परत गेस्ट हाऊसला निघून गेले होते.
दरम्यान, 900 कोटींच्या चारा घोटाळ्यात हा 33 वा आणि लालूंशी निगडित दुसरा निर्णय असेल. लालूंवर चारा घोटाळ्याचे 7 खटले दाखल आहेत. एका खटल्यात त्यांनी 6 वर्षे शिक्षा झालेली आहे. लालूंविरुद्ध 5 इतर खटल्यांची सुनावणी सुरू आहे.
कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी काय म्हणाले लालू?
- रांचीच्या रेल्वे गेस्ट हाऊसमध्ये लालूंनी मीडियाला संबोधित केले. ''माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आज ना उद्या मला न्याय जरूर मिळेलच. आमच्या वकिलांनी सर्व आवश्यक पुरावे कोर्टात सादर केले आहेत. ते सुटकेसाठी पुरेसे आहेत.'', असे लालूंनी उपस्थित पत्रकाराना सांगितले. नंतर ते चिरंजीव तेजस्वी यादव यांच्यासह गेस्ट हाऊसला रवाना झाले.
- ते म्हणाले- "सर्वांना न्याय मिळत आहे, आम्हालाही मिळेल. मी मागासवर्गीय आहे. मलाही न्याय मिळेल. एकाच कोंबडीचा 9 वेळा बळी दिला जात आहे.
- दुसरीकडे, शुक्रवार संध्याकाळी रांची एअरपोर्टावर लालू म्हणाले होते, ''जर मी एखाद्याकउून पैसे घेतलेले असतील तर सीबीआयने पुरावे द्यावेत. मला कोणत्या गोष्टीची शिक्षा द्यायची आहे. 20 वर्षांपासून मला त्रस्त केले जात आहे. न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरवसा आहे. 2जीप्रमाणेच या प्रकरणातही निर्णय येईल. भाजप आणि सीबीआय मला आणि कुटुंबाला त्रास देत आहे.''
CBIने 100 हून जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवले - खटल्याची सुनवणी सीबीआय कोर्टात 1996 पासून सुरू आहे. सीबीआयने 100 हून जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. अनेक दस्तऐवजही कोर्टात सादर करण्यात आले आहेत. आरोपींकडून बचावासाठी साक्षीदारही सादर करण्यात आले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णयाची तारीख निश्चित करण्यात आली. चारा घोटाळ्यात कोण-कोण आरोपी? - लालू प्रसाद आणि डॉ. जगन्नाथ मिश्र यांच्याशिवाय इतर आरोपींमध्ये बिहारचे माजी मंत्री विद्यासागर निषाद, जगदीश शर्मा, आरके राणा, ध्रुव भगत, फूलचंद सिंह, महेश प्रसाद, बेक जूलियस, एसी चौधरी, डॉ. कृष्ण कुमार प्रसाद, सुधीर भट्टाचार्य, त्रिपुरारी मोहन प्रसाद, संजय अग्रवाल, ज्योति झा, गोपीनाथ दास, सुनील गांधी, सरस्वती चंद्र, साधना सिंह, राजाराम जोशी आणि सुशील कुमार यांचा समावेश आहे. आरजेडी प्रमुखांवर पदाच्या दुरुपयोगाचा आरोप - बिहारचे तत्कालीन सीएम आणि अर्थमंत्री लालू प्रसाद यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी पदाचा दुरुपयोग करत याप्रकरणी चौकशीसाठी आलेल्या फाइलला 5 जुलै 1994 ते 1 फेब्रुवारी 1996 पर्यंत अडकवून ठेवले. पुन्हा 2 फेब्रुवारी 1996 रोजी तपासाचे आदेश दिले, तोपर्यंत चारा घोटाळ्याचे प्रकरण समोर आलेले होते.
- आरजेडी प्रमुख लालू यादव यांच्याविरुद्ध चारा घोटाळ्याशी निगडित 7 प्रकरणे दाखल आहेत. एकात निर्णय आलेला आहे. शनिवारी देवघर जिल्ह्यात दुसऱ्या केसमध्ये निर्णय येत आहे. इतर 5 खटल्यांची सुनावणी सुरू आहे.
कसा झाला होता चारा घोटाला? - चारा घोटाळ्यात 900 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. दरम्यान, देवघर ट्रेझरी (कोषागार) मधून अवैध रीतीने 1991 ते 1994 दरम्यान 6 बनावट वाटपपत्रांतून 89,04,413 रुपये काढण्यात आले. तर बिहार सरकारकडून औषध आणि चारा खरेदीसाठी फक्त 4 लाख 7 हजार रुपयेच पास करण्यात आले होते. - चाईबासा कोषागारमधून चुकीच्या पद्धतीने पैसे काढल्याप्रकरणी लालू यादव यांना शिक्षा झालेली आहे. 1997 मध्ये ते पहिल्यांदा तुरुंगात गेले होते. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. सध्या ते जामिनावर आहेत. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment