
आर्णी (यवतमाळ)- पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यासाठी देशातील जनतेला मोठी मोठी स्वप्न दाखवून 2014 साली एक हाती सत्ता काबीज केली होती. माञ साडे तीन वर्षाचा कार्यकाळ उलटला तरी देखील जनतेच्या खात्यात पंधरा लाख रूपये जमा झाले नाही,त्यामुळे याची आठवण करून देण्यासाठी आर्णी येथील 25 वर्षीय एका युवकाने चक्क दाभडी ते वडनगर(गुजरात) असा सायकलने प्रवास आज(ता.1 डिसेंबर) दुपारी साडे चार वाजेदरम्यान सुरू केला.
अवधुत देविदास गायकवाड (वय- 25, रा.अशोक लेआऊट आर्णी) असे दाभडी ते वडनगर सायकलने प्रवास करणार्या युवकाचे नाव आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये आर्णी तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या दाभडी या गावात येऊन चहा पे चर्चा कार्यक्रम करून देशभरातील लाखो शेतकर्यांसोबत संवाद साधून शेतमाला हमी भाव, काळाधन देशात आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात पंधरा लाख रूपये सह विविध आश्वासने दिली होती.
त्या अंनुसंगाने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आर्णी येथील अवधुत गायकवाड यांनी थेट दाभडी ते वडनगर(गुजरात) असा सायकलने प्रवास सुरू केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावी जावून समस्या जनतेच्या विविध मांडण्याचा दृष्टीने हा आंदोलन असल्याचे त्या युवकाचे म्हणंणे आहे.विशेष म्हणजे आर्थिक प्रस्थितीवर मात करण्याच्या दुष्टीकोणातून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 14 ऑगस्ट 2014 पासून जनधन योजना सुरू केली.२० ऑगस्ट पासून ह्या योजनेची अमंलबजावणी सुरू झाली.त्या नंतर करोडो लोकांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जनधन योजनेचे खाते सुध्दा उघडले माञ ज्या उद्दिष्टने जनधन योजना सुरू करण्यात आली तसा लाभ जनधन योजनेतील खातेदारांना मिळाला नाही.त्यामुळे या योजनेत सरकारने केवळ जनतेची फसवणूक केल्याचा आरोप सायकलने याञा करणार्या अवधुत गायकवाड यांनी केले आहे.
दाभडी ते वडनगर प्रवासा दरम्यान लागणार्या गावात जावून लोकांकडून जनधन खात्याचे पास बुकची झेराॅक्स जमा करून जमा झालेल्या सर्व झेराॅक्स वडनगर येथील मोदी यांच्या घरी नेऊन देणार असल्याचे अवधुत गायकवाड यांनी सांगितले.मोदी सरकारच्या कार्यकाळात युवक वर्ग सर्वात जास्त बेरोजगार झाला असून शेतकरी,शेतमजूर आणि सामान्य नागरिक यांचे प्रश्न पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण दाभडी ते वडनगर अशी सायकल याञा करित आहे.त्यामुळे पतंप्रधान मोदी नक्की समस्या सोडवणार असा विश्वास त्या युवकाने व्यक्त केले आहे.
दाभडी ते वडनगरदरम्यान घेणार 25 स्टाॅप
सरकारने दिलेले आश्वासन आठवण करून देण्यासाठी निघालेल्या अवधुत गायकवाड एकुण 25 ठिकाणी मुक्काम ठोकणार असून दाभडी, आर्णी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदूबार, बारडेरच्या, उधना, सुरत, अकलेश्वर, बडोदा, खेड, अहमदाबाद आणि शेवटी वडनगर असा प्रवास करणार असून दिवसाला केवळ पन्नास किलो मीटरचा प्रवास करणार आहे.
लोकशाही मार्गाने सायकल याञा काढली
मी सरकार विरोधात आंदोलन करित नसून लोकशाही मार्गाने आणि सरकारने जनतेला दिलेले आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी तब्बल बाराशे किलो मिटर चा सायकलने प्रवास करणार आहे. माञ पोलिस यंञनेने माझा लोकशाही व शांततेच्या मार्गाने असलेला आंदोलन दडपण्याचा प्रत्यन केल्यास आंदोलन सुरूच ठेवणार.
- अवधुत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते
Post a Comment