![]() |
अमरावती - शुक्रवारी२२ डिसेंबरला वर्षातील सर्वात लहान दिवस असेल. हा दिवस १२ तासांचा नसेल तर तो नेहमीपेक्षा 1 तास १३ मिनिटांनी लहान राहणार असून, दिवसाचा कालावधी १० तास ४७ मिनिटांचा असणार आहे,अशी माहिती खगोलीय घटनांचे अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.
शुक्रवारी २२ डिसेंबरला सूर्य दक्षिणेकडे असतो. या बिंदूला विंटर सोल्स्टाईस असे म्हणतात. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातील सर्वात लहान तर रात्र ही सर्वात मोठी असते. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने असे घडत असते. याचा परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण दक्षिणायणही अनुभवता येते. वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे उत्तरायण दक्षिणायन लक्षात येते, असे अभ्यासकांनी सांगितले. पृथ्वीवरील ऋतूही पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीनेे निर्माण होतात. आकाशात वैषुविक, आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदन बिंदू आहेत. यापैकी एका छेदन बिंदूत सूर्य २२ मार्चला प्रवेश करतो याला वसंत संपात बिंदू असे म्हणतात. त्याच्या विरुद्ध बिंदूत २३ सप्टेंबरला सूर्य प्रवेश करतो याला शरद संपात बिंदू असे म्हणतात. या दोन्ही दिवशी रात्र दिवसाचा कालावधी सारखा असतो. दिवस रात्रीच्या कालावधीतील बदल अनुभवण्याची २२ डिसेंबरला विद्यार्थी, खगोल प्रेमींना संधी आहे. त्यांना दिवस रात्रीच कालमापन करता येईल १० तास ४७ मिनिटांच्या लहान दिवसाचा अनुभव घेणेही जिज्ञासूंसाठी रंजक ठरेल. याचा विद्यार्थ्यांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विजय गिरूळकर प्रवीण गुल्हाने यांनी केलेे.
|
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment