0
NTPC दुर्घटना आपबिती : इशारा न देताच उघडले बॉयलरचे गेट; छतावरून उडी मारून वाचवले प्राण

लखनऊ -रायबरेलीच्या जवळ असलेल्या उंचाहार येथील एनटीपीसी पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचे अॅटोमॅटिक गेट कोणताही अलर्ट न गेता उघडण्यात आले होते, तसे झाले नसते तर दुर्घटनेत एवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसता. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. सुमारे 100 जण जखमी आहेत. याठिकाणी श्यामा प्रसाद मुखर्जी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमींशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपबिती सांगितले. एकाने सांगितले की, तो आग आणि धुराच्या लोटांमध्ये अडकला होता. पण पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारत त्याने स्वतःचे प्राण वाचवले.

प्लान्टमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, बॉयलरचे गेट उघडण्याआदी इंजिनीअरचा अलर्ट येतो. ही रुटीन प्रोसेस आहे. पण बुधवारी याबाबत सांगण्यात आले नव्हते. 
- त्यांनी असेही सांगितले की, उन्होंने या बॉयलरचे काम पूर्ण झालेले नव्हते. पण तरीही त्यापासून वीज तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

आग आणि घुरामध्ये अडकला..
- सोनभद्र जिल्ह्यातील राहणारे अरविंदकुमार दुर्घटनेत गंभीररित्या जखमी जखमी झाले आहेत. त्यांच्याबरोबर चुलतभाऊ हरिशंकरही आहेत. तेही जखमी झाले आहेत. दोघे एनटीपीसीमध्ये काम करातत. 
- हरिशंकर यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी, सुमारे 250 ते 300 लोक काम करत होते. जेव्हा बॉयलर फुटले तेव्हा मी त्याच्यापासून दूर होतो. पण अरविंद जवळ होता. त्यामुळेच तो जास्त भाजला. 
- ते म्हणाले, आग आणि धुरापासून वाचण्यासाठी मी पायऱ्यांनी वरच्या बाजुला पळालो. पण रस्ता दिसला नाही. त्यामुळे मी पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. 
- हॉस्पिटलला येताना भाऊ गंभीर अवस्थेत होता. पण डॉक्टर्स म्हणाले तो वाचणे कठीण आहे. पण आता उपचार सुरू आहे.

पुढच्या वर्षी होणार होते, लग्न.. जमा करत होतो पैसे
- हरिशंकरने सांगितले की, अरविंदचे तीन भाऊ आहेत. त्यांच्यात हा सर्वात मोठा आहे. पुढच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्याचे लग्न होणार होते. 
- अरविंद दिवाळीलाही घरी आला नव्हता. त्याने कुटुंबीयांना म्हटले होते की, पैसे जमा करून पुढच्यावर्षी येईल.

90% भाजलेल्या अमृतवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी..
- या अपघातात अमृत 90 टक्के भाजला होता. हॉस्पिटलमध्ये त्याची पत्नी सुशीलाने सांगितले की, आम्हाला चार मुले आहेत. त्यापैकी 3 मुली आहेत. मोठी मुलगी लग्नाला आली आहे. पतीच्या कमाईतूनच खर्च चालत होता. आता सर्व काही कसे होईल काही लक्षात येत नाही.

थर्ड क्लास सेफ्टी मटेरियल..
- जखमींमध्ये समाविष्ट दिलीप आणि सुनील यांनी सांगितले की, सध्या बॉयलर बनवण्याचे काम सुरू होते. पण ते सुरू करण्यात आले. 
- बॉयलर फुटताच आसपास काम करणाऱ्या 5 ते 6 मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला. आम्ही थोड्याच अंतरावर काम करत होतो. 
- त्यांनी सांगितले, कंपनीकडून आम्ही सेफ्टीसाठी हेल्मेट, ग्लोव्हज, शूज आणि बेल्ट मिळतात पण सर्व थर्ड क्लास क्वालिटीचे असते.

Post a Comment

 
Top