0
ठाण्याच्या सभेत राज ठाकरे सांगणार MNS च्या फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा


मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा घेणार असून या सभेत ते फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या आंदोलनची पुढची दिशा काय असेल, हे सांगणार आहेत. फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभा घेत आहेत.
रेल्वे स्टेशन परिसरातून फेरीवाल्यांना हटवण्यासाठी दिलेले अल्टिमेटम संपल्यानंतर, मनसेने ठाणे स्टेशनपासून खळ्ळ खटॅक आंदोलनाला सुरुवात केली होती. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर आता फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर लोकांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा कुठे होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. सेंट्रल मैदान किंवा इतर ठिकाणी सभा घेण्यासाठी मनसे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

 
Top