0
आरोपीला शनिवारी बालसुदार गृहामध्ये आणण्यात आले.

फरीदाबाद/गुडगाव - गुडगावच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न हत्याकांडातील आरोपी असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने सीबीआयवर धमकी देऊन गुन्हा कबूल करून घेतल्याचा आरोप केला आहे. सोमवारी आरोपीने म्हटले की, सीबीआयने मला म्हटले होते की, गुन्हा कबूल केला नाही तर भावाचा मर्डर करू. त्यामुळेच सीबीआयने मला म्हटले तसेच मी करत राहिलो.
आरोपीचा जबाब सीबीआयच्या थेअरीपेक्षा वेगळा..
- सोमवारी सकाळी सीबीआयचे डीएसपी एके बस्सी बालसुधारगृहात पोहोचले. त्यांच्याबरोबर गुडगांवच्या चाइल्ड प्रोटेक्शन अँड वेल्फेअर ऑफिसर (सीपीडब्ल्यूओ) रिनू सैनी होत्या. 
- रिनू यांनी आरोपी विद्यार्थ्याबरोबर एका वेगळ्या खोलीत दोन तास चर्चा केली. त्याची मानसिक स्थिती आणि संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली. 
- आरोपीने रिनू जे सांगितले ते सीबीआयची थेअरी आणि अटकेसाठी दिलेल्या कारणांपेक्षा अगदी विपरित आहे.

भावावर खूप प्रेम..
- आरोपी विद्यार्थ्याने सैनी यांना सांगितले की, सीबीआयने मला म्हटले होते की, तुला गुन्हा कबूल करावा लागेल नाही तर तुझ्या भावाचा मर्डर करू. 
- काऊंसिलिंगदरम्यान विद्यार्थी सैनीला म्हणाला, मी भावावर खूप प्रेम करतो, त्याला मरताना पाहू शकत नाही.

प्रद्युम्नला मी मारले नाही..
- आरोपीने म्हटले की, मी प्रद्युम्नची हत्या केली नाही. सीबीआयने बळजबरी गुन्हा कबूल करून घेतला आहे. सीबीआयने टॉर्चर केले, धमकावले असेही तो म्हणाला. 
- सैनी यांनी आरोपीचा जबाब लिहून घेतला आहे. हा लेखी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच जुवेनाइल जस्टीस बोर्डाचे प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर सादर केला जाईल.

CBI च्या उपस्थितीत घेतली आईची भेट..
- सोमवारी सीबीआयच्या उपस्थितीत आरोपी विद्यार्थ्याने त्याचे आई-वडील आणि भावाची भेट घेतली. 
- तिघे एक तास आरोपीसोबत होते. यादरम्यान, आरोपीची आई मुलाला मिठी मारून रडत राहिली. लहान भाऊदेखिल आई आणि भावाला पाहून रडायला लागला.

Post a Comment

 
Top