0
अायसीसी कसाेटी क्रमवारीत विराट पाचव्या स्थानावर; शतकांच्या अर्धशतकाचा फायदा

दुबई- श्रीलंकेविरुद्ध सलामीच्या कसाेटीमध्ये संकटात सापडलेल्या टीम इंडियाला तारण्यासाठी कर्णधार विराट काेहलीने (नाबाद १०४) झंझावाती शतकी खेळी केली. याच शतकाच्या बळावर यजमान टीम इंडियाचा पराभव टळला अाणि कसाेटी अनिर्णीत राहिली. त्याचे हे करिअरमधील ५० वे शतक ठरले. याच शतकामुळे त्याला अायसीसीच्या कसाेटी क्रमवारीमध्ये प्रगती साधता अाली. त्याने फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये पाचवे स्थान गाठले. त्याचे अाता ८१७ गुण झाले अाहेत. त्याने क्रमवारीमध्ये एका स्थानाने सुधारणा केली. त्याने अाॅस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वाॅर्नरला मागे टाकले. यातून वाॅर्नरची सहाव्या स्थानावर घसरण झाली.

अायसीसीने नुकतीच कसाेटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताचे दाेन सुपरस्टार चमकले. विराट काेहली अाणि भुवनेश्वर कुमारने प्रगती साधली. फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये चेतेश्वर पुजाराने चाैथे स्थान कायम ठेवले. त्याच्या नावे ८६६ रेटिंग गुण अाहेत. त्यापाठाेपाठ लाेकेश राहुलने अाठवे स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले. त्याचे ७५७ गुण अाहेत.

काेलकाता कसाेटीत एकूण सहा विकेट घेणारा माे. शमीही क्रमवारीमध्ये चमकला. त्याला एका स्थानाने सुधारणा करता अाली. त्याने १८ वे स्थान गाठले अाहे.

भुवनेश्वरने करिअरमध्ये गाठले सर्वाेत्तम स्थान
यजमान टीम इंडियाच्या भुवनेश्वर कुमारने काेलकाता कसाेटीमध्ये अापल्या भेदक गाेलंदाजीने पाहुण्या श्रीलंका टीमचे कंबरडे माेडले. त्याने या कसाेटीत एकूण ८ विकेट घेतल्या. यामुळे त्याला क्रमवारीमध्ये माेठी प्रगती साधता अाली. त्याने करिअरमधील सर्वाेत्तम स्थान पटकावले. ताे अाता गाेलंदाजांच्या क्रमवारीमध्ये २९ व्या स्थानावर अाला अाहे. त्याला क्रमवारीमध्ये अाठ स्थानांचा फायदा झाला.

जडेजाची तिसऱ्या स्थानावर घसरण
श्रीलंकेविरुद्ध कसाेटी मालिका सुरू हाेण्यापूर्वी भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा हा जगातील नंबर वन गाेलंदाज हाेता. मात्र, काेलकाता कसाेटीमध्ये त्याला एकही विकेट घेता अाली नाही. याचा त्याला क्रमवारीत माेठा फटका बसला. त्याची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. त्यापाठाेपाठ अश्विनने चाैथे स्थान कायम ठेवले अाहे.

Post a Comment

 
Top