
मुंबई - येत्या काही दिवसांत मी मंत्रिपदाची शपथ घेईन, असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला. शिवसेना एक नंबरचा घाबरट पक्ष असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली आणि माझ्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसमध्ये आक्रमकता उरलेली नाही, असे सांगत त्यांनी नोटाबंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनावरही टीका केली. कॉंग्रेसने कितीही संघर्ष केला तरी गुजरातमध्ये भाजपचाच विजय होईल, असे ते या वेळी म्हणाले.
मी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलणार नाही पण वैयक्तिक बाबतीत बोलेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, की माझा एकट्याचाच शपथविधी होईल. तो लवकरच होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि मंत्रिमंडळातील प्रमुख खाती हाताळली आहेत. याचा मुख्यमंत्री सन्मान ठेवतील ही अपेक्षा आहे, असे राणे यांनी सांगितले.
Post a Comment