0
Mumbai : 3 women dead, one injured after being hit by train near Malad station

मुंबई : मुंबईत रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या महिला मजुरांना ट्रेनने उडवलं. या दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. या चारही महिलांची ओळख अद्याप पटलेली नाही.
लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्टेशनजवळ आज दुपारी 12.30 वाजता घटना घडली. ही लोकल बोरीवलीहून चर्चगेटच्या दिशेने जात होती.
गँगमॅन तसंच रेल्वे ट्रॅक दुरुस्तीच्या टीममध्ये या चार महिला होत्या. ट्रॅक दुरुस्ती करताना एकाच वेळी दोन-तीन ट्रेन येताना दिसल्या. परंतु कोणती लोकल कोणत्या ट्रॅकवर येणार याचा अंदाज महिलांना आला नाही.
महिला मजूर काम करत असलेल्या ट्रॅकवर ही ट्रेन आली. यावेळी गोंधळ उडाल्याने ट्रेनने महिलांना जोरदार धडक दिली. यात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Post a Comment

 
Top