0
शिवसेना आमदार सुर्वे हेच माझे वडील; युवकाचा दावा; डीएनए चाचणीसाठी न्यायालयात धाव

मुंबई-शिवसेनेचे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे हे आपले जैविक वडील असल्याचा दावा दहिसर येथे राहत असलेल्या २४ वर्षीय युवकाने केला आहे. त्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आमदारांच्या डीएनए चाचणीची मागणी केली आहे.
राज भारत कोरडे असे या युवकाचे नाव आहे. आपली आई उज्ज्वला कोरडे असून वडील अामदार प्रकाश सुर्वे आहेत, असे या युवकाचे म्हणणे आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी चालू असून हे विरोधकांचे कारस्थान आहे, असे आमदार सुर्वे यांचे म्हणणे आहे.

संबंधित युवकाचा दावा खरा िनघाल्यास आमदार सुर्वे यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणुकीवेळी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरणार आहे. परिणामी सुर्वे यांना आपल्या आमदारकीवर पाणी सोडावे लागू शकते.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी आपले वडील असल्याचा राेहित शेखर या युवकाने दावा केला होता. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तिवारी यांची डीएनए चाचणी झाली आणि रोहित हा तिवारी यांचा जैविक पुत्र असल्याचे अखेर तिवारी यांनाही मान्य करावे लागले हाेते.

Post a Comment

 
Top