0
'बलात्‍कार झाल्‍यानंतर तक्रार करा', तरुणीला नागपूर पोलिसांचे धक्‍कादायक उत्‍तर

नागपूर- सांगलीतील घटनेने राज्‍यभरात पोलिसांविरोधात संताप व्‍यक्‍त होत असूनही पोलिसांनी यातून काहीच धडा घेतलेल्‍या नसल्‍याचे दिसत आहे. कारण नागपूरमध्‍ये गुंडाविरोधात तक्रार देण्‍यासाठी गेलेल्‍या तरुणीला चक्‍क 'धमकीची तक्रार नको, गुंडाने बलात्‍कार केल्‍यानंतर तक्रार द्यायला या', असे धक्‍कादायक उत्‍तर पोलिसांनी दिले आहे.
अमिता जयस्‍वाल असे या तरुणीचे नाव आहे. या तरुणीने काही दिवसांपूर्वी माहितीच्‍या अधिकाराचा वापर करत अतिक्रमणाविरोधात महापालिकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत महापालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. त्‍यानंतर मात्र गुंडांकडून तिला धमक्‍या यायला सुरुवात झाली. याविरोधात पोलिसांकडे तक्रार देण्‍यासाठी तरुणी गेली असता तिला हे धक्‍कादायक उत्‍तर ऐकायला मिळाले आहे.

Post a Comment

 
Top