
नांदेड
धर्माबाद येथील एका जिनिग प्रेसिंगमध्ये काम करणाऱ्या मुस्लीम तरुणाने उमरखेड तालुक्यातील हिंदु अल्पवयीन युवतीला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या मुस्लीम मवाल्याला अटक केली आहे. तसेच अल्पवयीन हिंदु मुलीला पालकांच्या स्वाधीन केले आहे.
धर्माबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर या तालुक्याच्या ठिकाणी राहणारा तनवीर शहा इसाक शहा फकीर हा धर्माबाद येथे मनजित कॉटन जिनिंग अॅण्ड प्रेसिंग या फॅक्ट्रीमध्ये कामाला होता. या मुस्लिम तरुणाने यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे वास्तव्यास असताना एका हिंदु कुटुंबाशी ओळख वाढवली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन तनवीरने संबंधित कुटुंबातील १७ वर्षीय अल्पवयीन हिंदु तरुणीला पळवून नेले.
दरम्यान, मुलीला पळवून नेल्यावर संबंधित मुस्लीम मवाल्याने तिला भिवंडी, नवी मुंबई येथे ठेवून तिचा गैरफायदा घेतला. संबंधित अल्पवयीन हिंदु तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धर्माबाद उपविभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे आणि धर्माबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी तातडीने यासंबंधीची तपास यंत्रणा कामाला लावून तनवीर शहा याच्यासह अल्पवयीन तरुणीला मुंबईच्या भिवंडी भागातून ताब्यात घेतले. याप्रकरणी तनवीर शहाला अटक करुन न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर पीडित हिंदु मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Post a Comment