0
भीषण विस्फोट: पत्त्यासारखी कोसळली इमारत, ढिगाऱ्याखाली रक्तमांसाचा सडा, मृतदेह अन् जखमी



लुधियाना - सोमवारी सकाळी पावणे 7 वाजता सुफिया चौकाजवळ जनकपुरी परिसरात फ्लेक्स व प्लास्टिकचे सामान बनवणाऱ्या फॅक्टरीच्या 5 मजली इमारतीला आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या फायर ब्रिगेडच्या 25 वाहनांनी 10.30 वाजेपर्यँत आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु 11 वाजता इमारतीत ठेवलेल्या केमिकल ड्रममध्ये पहिला विस्फोट झाला आणि आग पुन्हा भडकली. मदतकार्य नंतर सुरू झाले.
ढिगाऱ्यात दबले 32 जण, 4 मृतदेह काढले...
- 11.15 वाजता दुसरा विस्फोट झाला. दुपारी 12.30 वाजता तिसरा विस्फोट झाला तेव्हा 5 मजली इमारत जमीनदोस्त झाली. विस्फोटासह लगतच्या दोन फॅक्टरीही भुईसपाट झाल्या.
- इमारत पडल्याने 9 अग्निशमन कर्मचारी, 7 फॅक्टरी वर्कर व बचाव कार्यात लागलेले 30 ते 32 जण ढिगाऱ्याखाली दबले.
- रात्री 1.45 वाजता एकूण 8 मृतदेह काढण्यात आले, मरणाऱ्यांपैकी काही जणांची ओळख पटवण्यात आली आहे.
- जखमी व्यक्तींना सीएमसी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यादरम्यान, रात्री अडीच वाजता ढिगाऱ्यातून पुन्हा आग भडकली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले.
दोन तासांनंतर जिवंत काढले बाहेर...
- लगतच्या फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच जनता रिक्षा फॅक्टरीचे मालक रोहित कपूर आपल्या फॅक्टरीतील सामान काढू लागले. यादरम्यान एकाच झटक्यात त्यांची फॅक्टरीही कोसळली.
- तब्बल 2 तास ते ढिगाऱ्याखाली दबलेले होते. यानंतर त्यांना जिवंत काढण्यात आले. दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. डोक्याला आणि शरीराच्या इतर जागेवरही दुखापत झाली. सध्या रुग्णालयात दाखल आहेत.
इमारत पडू लागली तेव्हा खालच्या बाजूला पळू लागले लोक
- ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढलेला विक्की म्हणाला, जेव्हा फॅक्ट्रीला आग लागली तेव्हा तोही बचाव कार्यात लागलेला होता. एकदा तर आग विझलीही होती. परंतु धुरामुळे प्रचंड त्रास होऊ लागला. यानंतर आम्ही पहिल्या मजल्यावर बचाव कार्यासाठी गेलो. ऑफिसमधून सामान काढत असताना पुन्हा जोरदार धमाका झाला.
- यानंतर बिल्डिंग खाली पडताना सर्व जण खालच्या बाजूला पळाले. वरतून सामान पडल्याने ते शिडीवरून पडले. त्यांचे पाय ढिगाऱ्याखाली दबले होते.
- यानंतर त्यांच्या डोक्यावर लाकडाचे बॉक्स येऊन पडले. समोर अंधार पसरला. यानंतर मला कळले नाही, काय झाले ते!
एनडीआरएफ, सैन्य, पोलिस कर्मचारी बचाव कार्यात व्यग्र
- बचाव कार्यादरम्यान इमारत पडल्याने मोठा ढिगारा पडला. बचाव कार्यासाठी लुधियानाशिवाय समराला, हलवारा, जगराओं आणि खन्ना येथूनही वाहने आली होती.
- पोलिस कमिश्नर यांच्या देखरेखीत 2 एडीसीपी, 4 एसीपी, 6 इन्स्पेक्टर, 100 हून अधिक महिला पोलिस कर्मचारीही, 50 मिलिटरी जवान, 20 एनडीआरएफ, 16 एसडीएफ, 60 अग्निशमन कर्मचारी, 200 नगर पालिकेचे कर्मचारी बचाव कार्यात गुंतले होते.

Post a Comment

 
Top