0
Thane : Contractor Sanket Jadhav kills self, police finds suicide note latest updateठाणे : ठाण्यात घोडबंदर रोडवर कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत संकेत जाधव व्यावसायिक आणि कंत्राटदार असून त्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे.
घोडबंदर रोडवर गायमुख परिसरात स्विफ्ट कारमध्ये संकेतचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिस घटनास्थळी पोहचले. संकेत जाधव ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील रहिवासी असून त्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गाडीत संकेतच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये “विद्या मला माफ कर, मला धंद्यात नुकसान झालं” अशा वाक्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जाधव हा ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. कासारवडवली पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. ज्या स्विफ्ट कारमध्ये संकेतचा मृतदेह आढळला, त्यात पोलिसांना रिव्हॉल्वरही सापडली. त्यामुळे त्याने स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
धंद्यात नुकसान आणि प्रशासनामधील भ्रष्टाचार याच्यावर ठपका ठेवत ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांनी आत्महत्या केल्यानंतर आता संकेत जाधवच्या आत्महत्येने पुन्हा एकदा ठाण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास  कासारवडवली पोलिस करत आहेत.

Post a Comment

 
Top