0
मदतकार्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी पोहोचले आहेत. आतापर्यंत ५ नागरिकांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र अद्यापही अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. ख्वाजा सय्यद ( वय ७० ), रेहान ( वय ७ ), सलमा अन्सारी ( वय ३५ ) , शकील ( वय ३७ ), आसिफ ( वय २१ ) आबिद ( वय १९) हे जखमी झाले आहेत.
इमारतीजवळ मोठया प्रमाणावर मदतकार्य सुरू आहे. जखमींना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आहे. इमारतीपर्यंत खुला रस्ता नसल्याने मदतकार्यास अडचण येत आहे. प्रत्येक मजल्यावर चार कुटूंबे राहत होती.

Post a Comment

 
Top