
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अस्वच्छ शौचालयांचे फोटो आणि टमरेल भेट देण्याचा प्रयत्न करणार्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिला 'राईट टू पी'च्या कार्यकर्त्या आहेत.
मुंबईत महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह नाहीत, तरीही मुंबई हगणदारीमुक्त शहर घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राईट टू पीच्या महिला कार्यकर्त्या
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी 'वर्षा' निवासस्थानी भेटायला गेल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या महिला कार्यकर्त्यांना भेट नाकारली. तरीही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा या महिला कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले आहे.
Post a Comment