0
लग्नसोहळ्यानिमित्त ऋषीकेशला पोहोचली श्रिया पिळगावकर, गंगा आरतीतही झाली सहभागी

मराठी अभिनेते निर्माते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर सध्या हॉलिवूडच्या प्रोजेक्टमध्ये गुंतलेली आहे. 'एकुलती एक', 'फॅन' यांसारखे चित्रपट केल्यानंतर श्रिया आता भारतात फार कमी वेळा येते. सध्या एका लग्नसोहळ्यानिमित्त श्रिया भारतात आहे तेसुद्धा उत्तराखंडमधील निसर्गरम्य ठिकाण ऋषीकेश येथे.
श्रियाने तिचे ऋषीकेशमधील काही फोटो इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात ऑरेंज लेहंग्यामध्ये फार स्टनिंग दिसत आहे. यावेळी तिने गंगा आरतीचेही काही फोटो शेअर केले आहेत.

Post a Comment

 
Top