0
मॅक्सी प्रकारातील गाऊन घालून मंदिरात कशाला आला असे विचारताच मारहाण करण्यास सुरुवात केली.

मुंबई- मॅक्सी टाईपचा ड्रेस (गाऊन) घालून मंदिरात कशासाठी आलात? असा प्रश्न एका महिलेने विचारल्याने संतप्त होत एका लेडी पोलिस ऑफिसरने संबंधित महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. व्हिडिओ समोर येताच संबंधित महिलेने पोलिस अधिकारी प्रतिक्षा लाकडे हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओत प्रतिक्षा लाकडे महिलेला जोराजोरात व लाथा बुक्या घालताना दिसत आहे.यामुळे भडकली पोलिस ऑफिसर.....
- मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कल्याण (पूर्व) भागातील तिसगाव भागातील तिसाई मंदिरात घडली. तेथे वेस्टर्न ड्रेस आणि गाऊन घालून मंदिरात जाण्यास मनाई आहे.
- मंगळवारी रात्री 7 वाजता महिला पोलिस अधिकारी प्रतीक्षा लकडे मॅक्सी टाईप गाऊन घालून मंदिरात पोहचली होती. 
- लकडेला आशा गायकवाड नावाच्या एका महिलेने असा ड्रेस घालून मंदिरात कशाला जाता असे विचारले. सोबत मंदिराच्या आता जाऊ नका असे सांगितले.
- आशाने जाब विचारल्याने पोलिस अधिकारी प्रतीक्षा यांना राग अनावर झाला. त्यांनी लागलीच महिलेला खाली पाडले व लाथा बुक्यांनी मारहाण करायला सुरूवात केली.
स्थानिकांनी केला हा आरोप-
- महिला अधिकारी जेव्हा पीडित महिलेला मारहाण करत होती तेव्हा तेथे काही लोक उपस्थित होते. पण कोणीही पुढे आले नाही.
- या घटनेचा व्हिडिओ कॅम्पसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. ज्यात आरोपी महिला ऑफिसर आशाबाईला मारहाण करताना दिसत आहे.
- घटनेनंतर स्थानिक लोकांनी पोलिसांवर आरोप केला की, ते महिला पोलिस अदिका-याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच एफआयआर ऐवजी फक्त तक्रार नोंदवून घेतली आहे.

Post a Comment

 
Top