0







पाश्चिमात्य लोकांचा पितृपक्ष , भूत पिशाच्च आणि भोपळ्याचा सण म्हणजे 'हॅलोविन'. ह्या प्रथेमागे लोंकांची अशी समजूत आहे की ह्या दिवशी त्यांचे पूर्वज त्यांना भेटायला पृथ्वी वर येतात आणि त्यांना शेतीच्या पीक कापणीच्या कामात मदत करतात. म्हणून पूर्वजांच्या स्वागतासाठी वेगवेगळे प्राण्यांचे, भूतांचे पोशाख घालून लोक  हा सण आनंदाने साजरा करतात. अमेरिकेत भोपळ्याच उत्पादन जास्त प्रमाणात होत म्हणून भोपळ्यांवर भूतांचे चेहरे कोरून ते दारात ठेवले जातात.
भोपळ्या पासून बनवलेले पदार्थ ह्यादीवशी लोक खातात. 
लहान मुलांच्या मानात असलेली भुतांची भीती घालवण्यासाठी इथे भूतांचे वेष परिधान केलेले लोक मुलांना चॉकलेट वाटतात. असा आहे गमतीशीर आणि भीतीदायक 'हॅलोविन'..
  पाश्चिमात्य देशात प्रसिद्ध असलेला हा सण दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात 31 तारखेला साजरा केला जातो. अमेरिकेतील इंडियाना राज्यातून  हे खास फोटो शेअर केलेत

Post a Comment

 
Top