वाटूर-अवघा एक दिवस वय असलेले ते अर्भक.. मातेच्या कुशीची ऊब मिळण्यापूर्वीच निर्दयी पालकांनी त्याला शेतात खड्डा खोदून अर्धवट गाडले. जन्मदात्यांनी अव्हेरले तरी नियतीला ते मान्य नसावे. काळ्या आईच्या (शेतीतील माती) कुशीतही त्याला जगण्याची ऊब मिळाली. कापूस वेचणाऱ्या महिलांच्या कानावर या अर्भकाचा टाहो पडला. त्याच्यावर वेळेत उपचार सुरू झाले आणि हा चिमुकला डॉक्टारांच्या निगराणीखाली सुरक्षित आहे. लवकरच त्याला बालकल्याण समितीकडे सोपवले जाणार आहे.
परतूर तालुक्यातील श्रीधरजवळा गावातील शेतकरी दौलतराव राजाराम खरात यांच्या शेतात शनिवारी महिला कापूस वेचणीचे काम करीत होत्या. या महिलांना एका नवजात बालकाचा टाहो कानी पडला. सुरुवातीला भास झाला असावा असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा आवाज आल्याने त्यांनी कपाशीच्या झाडांत बघितले असता खड्डा खोदून त्यात अर्धवटपणे गाडलेले पुरुष जातीचे जिवंत अर्भक दिसले. त्याचा चेहऱ्याकडील भाग सुदैवाने उघडा होता. हा प्रकार महिलांनी दौलतराव खरात यांना सांगितला. त्यांनी तातडीने सरपंच वसंतराव राजबिंडे यांना माहिती दिली. राजबिंडे यांचा फोन येताच परतूर पोलिस ठाण्यातील हवालदार शांतरक्षित कांबळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्भकाला उपचारासाठी परतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या बालकाच्या तोंडात माती गेली होती. त्याला मुंग्यांनीही चावा घेतला होता. डॉक्टारांनी त्याच्यावर तातडीने उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास जालना येथील महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगीतले. दरम्यान याप्रकरणी वसंतराव राजबिंडे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात मातेविरुद्ध परतूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वास घेण्यात होती अडचण
या बालकाला शनिवारी रात्री १०.४५ वाजता जालना येथील महिला व बालरुगणालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यास श्वास घेण्यात अडचण होती. त्यास अँटिबायोटिक देण्यात येत आहेत. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

...तर गमावला असता प्राण
दौलतराव खरात यांचे शेत गावापासून अवघ्या दोनशे मीटरवर आहे. महिलांचे कापूस वेचणीचे काम जवळपास संपत आले होते. आणखी १०-१५ मिनिटांतच त्या घरी परतल्या असत्या. मात्र तत्पूर्वीच या बालकाचे विव्हळणे महिलांनी ऐकल्याने त्याचे प्राण वाचले.

नाकातोंडात गेली होती माती
या अर्भकाला रुग्णालयात आणले तेव्हा त्याच्या संपूर्ण अंगाला माती लागलेली होती. शिवाय रडून-रडून ते थंड पडले होते. त्याच्या नाकातोंडातही माती गेली होती. आम्ही त्याच्यावर दोन तास औषधोपचार केले व त्यास पुढील उपचारासाठी जालना येथे हलवले. त्याला रुगणालयात आणण्यास तासभर जरी उशीर झाला असता तरी ते वाचू शकले नसते.
डॉ. प्रशांत अंभुरे, वैद्यकीय अधिकारी, परतूर.

कठोर कारवाई करावी
अवघ्या एक दिवसाच्या बालकाला अज्ञात आई-वडिलांनी कपाशीच्या शेतात अर्धवट पुरले होते. महिलांनी दौलतराव खरात यांना तातडीने माहिती दिल्यानंतर व खरात यांनी पोलिसांच्या मदतीने त्याच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले आहेत. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार असून पोलिसांनी असे कृत्य करणाऱ्या मातेवर तसेच त्याच्या वडिलांवर कठोर कारवाई करावी.
Post a Comment