
मुंबई - राज्यात प्लास्टिकची समस्या गंभीर असून शहरांमध्ये हजारो टन जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानी हाेत अाहे. हे लक्षात घेऊन राज्याच्या पर्यावरण विभागाने राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून प्लास्टिक कॅरिबॅग बंदी जाहीर केली आहे.
छोट्या असो किंवा बड्या मायक्राॅनच्या सर्व प्लास्टिकच्या पिशव्यांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घालून ‘प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र’ करण्यात येईल. पर्यावरणदृष्ट्या प्लास्टिकच्या वस्तू पर्यावरणाची अतोनात हानी करत आहेत. याच्या विघटनास प्रदीर्घ कालावधी लागतो, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
Post a Comment